Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Thakare : बिग बॉस 16 फायनलआधी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं; रोहित शेट्टीने दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 11:48 IST

Shiv Thakare And Rohit Shetty : शिव ठाकरे बिग बॉस 16 च्या स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक आहे. शिव बिग बॉस 16 च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जातो.

बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारीला आहे. एका दिवसानंतर बिग बॉस 16 चा विजेता जगासमोर येणार आहे. शोची ट्रॉफी कोणाला मिळणार, हे लवकरच कळेल. मात्र त्याआधी मराठमोळ्या शिव ठाकरेच्या (Shiv Thakare) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिग बॉसनंतर शिव ठाकरे रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13' या शोमध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

शिव ठाकरे बिग बॉस 16 च्या स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक आहे. शिव बिग बॉस 16 च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जातो. आता शिव ठाकरे या शोचा विजेता ठरतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी शिव ठाकरेला रोहित शेट्टीने मोठी ऑफर दिली आहे. खरं तर, ग्रँड फिनालेपूर्वी रोहित शेट्टी बिग बॉसच्या घरात येऊन सर्व स्पर्धकांसोबत खतरनाक टास्क करताना दिसणार आहे.

बिग बॉसच्या आगामी पर्वाचा प्रोमो समोर आला आहे. रोहित शेट्टी शिव ठाकरे, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी आणि शालीन भनोट यांना टास्क देताना दिसत आहे. यानंतर तो म्हणतो की, तुमच्यापैकी एकाला खतरों के खिलाडीमध्ये जाण्याची संधी मिळेल.

शिव ठाकरेला शोची ऑफर 

रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टीने बिग बॉसच्या फायनलिस्टला आणखी एक कठीण टास्क दिला आहे. यानंतर त्याने खतरों के खिलाडीसाठी शिव ठाकरे यांची निवड केली. खतरों के खिलाडीसाठी शिव व्यतिरिक्त अर्चना गौतमचेही नाव समोर येत आहे. रोहित शेट्टी ग्रँड फिनालेमध्ये खतरों के खिलाडी 13 च्या पहिल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा करणार आहे. तसेच बिग बॉसच्या स्पर्धकांना थेट खतरों के खिलाडी 13 मध्ये जाण्याची ही पहिलीच संधी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शीव ठाकरेरोहित शेट्टीबिग बॉसखतरों के खिलाडी