Join us

Shiv Thakare : “मी वचन देतो की…” ‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरेनं पप्पांना केलं खास प्रॉमिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:55 IST

Shiv Thakare : 'बिग बॉस १६'नंतर शिव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच अनेक नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. सध्या मात्र त्याच्या इन्स्टा स्टोरीची चर्चा आहे.

'बिग बॉस १६'मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या जाम चर्चेत आहे. 'बिग बॉस १६' च्या ट्रॉफीनं शिव ठाकरेला हुलकावणी दिली. पण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र तो यशस्वी झाला. 'बिग बॉस १६'नंतर शिव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच अनेक नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. सध्या मात्र त्याच्या इन्स्टा स्टोरीची चर्चा आहे.

होय, शिवने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. एका खास व्यक्तीसाठी शिवने लिहिलेली ही खास स्टोरी सध्या तुफान व्हायरल होतेय. शिवचे बाबा मनोहरराव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाबाच्या वाढदिवसानिमित्त शिवने त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत एक वचनही दिलं आहे.  'माझ्या कूल पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री मनोहरराव उत्तमराव झिंगुजी गणूजी ठाकरे... मी तुमचा मुलगा तुम्हाला वचन देतो की तुम्हाला नेहमीच माझा अभिमान वाटेल,' असं शिवने म्हटलं आहे.  

 शिव  लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १३'मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. कंगना राणौतच्या 'लॉकअप २' या शोमध्येही तो झळकणार, अशी चर्चा आहे.  'बिग बॉस १६'ची ट्रॉफी शिवने जिंकावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण तसं झालं नाही. 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी  मिळाली नसली तरीही त्याच्या वाट्याला सलमान खानचा एक मोठा चित्रपट आला असल्याचं कळतंय.

येत्या काळात सलमान खानचे ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉसमराठी अभिनेता