Join us

Bigg Boss 15: रश्मी देसाईचा एक्स नवरा नंदिश संधू दिसला गर्लफ्रेंडसोबत, राहतोय तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 18:01 IST

रश्मी देसाई आणि नंदिश संधू २०१६ साली विभक्त झाले. त्यानंतर नंदिश या व्यक्तीला डेट करतो आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १५चा सीझन खूपच मनोरंजक झाला आहे. या मागचे कारण म्हणजे ५ वाइल्ड कार्ड एन्ट्री. यात टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईदेखील सहभागी आहे. तिला शोमध्ये पाहून तिचे चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत. सर्वांनाच माहित आहे की रश्मी देसाई घटस्फोटीत आहे. ती तिचा एक्स नवरा नंदिश संधूसोबत विभक्त झाली आहे.

रश्मी देसाई आणि नंदिश संधूचा घटस्फोट २०१६ साली झाला होता. त्या दोघांचेही घटस्फोट झाल्यानंतरही एकमेकांसोबत चांगले नाते होते. याबद्दल रश्मीने एका मुलाखतीत सांगितले होते. दरम्यान नुकतेच नंदिश संधू त्याची कथित गर्लफ्रेंड अंकिता शौरीसोबत स्पॉट झाला. यावेळी ते दोघे हातात हात घालून चालताना दिसले. खरेतर नंदिश आणि अंकिता रोमँटिक डिनर एन्जॉय करताना दिसले. 

घरगुती हिंसाचारामुळे रश्मी नंदिशपासून झाली वेगळीमीडिया रिपोर्ट्सनुसार, नंदिशची अंकितासोबतची वाढत्या जवळीकतेमुळे त्याचा रश्मीसोबत घटस्फोट झाला. तर दुसरीकडे घटस्फोटानंतर रश्मीला तो कोणासोबत आहे याच्याशी काहीच फरक पडत नव्हता. त्यावेळी रश्मीने सांगितले होते की घरगुती हिंसाचाराला कंटाळून तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

नंदिश आणि अंकिता राहत आहेत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंदिश आणि अंकिता आता लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. मात्र अद्याप त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केलेले नाही. रश्मी देसाईला मागील काही दिवसांपूर्वी सलमान खानला तिच्या एक्सवरून तिला चिडवत होता. खरेतर रश्मी देसाई बिग बॉस १३ मध्ये दिसली होती, त्यावेळी ती अरहान खानसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र सलमान खानने काही पर्सनल खुलासे केल्यानंतर रश्मीने अरहानसोबत ब्रेकअप केले होते. सलमान खानने रश्मीची मस्करी करत म्हटले होते की, मी ऐकलंय की आता तो चांगला व्यक्ती बनला आहे, त्यावर रश्मी हसत म्हणाली की, जे काही असेल देव त्याचे भले करो. मला त्याच्यापासून लांबच राहायचे आहे.

टॅग्स :रश्मी देसाईबिग बॉस