Join us  

Bigg Boss 15: आजपर्यंत जे घडले नाही ते घडले,पहिल्यांदाच सलमान खानने या स्पर्धकाचे घरात केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 10:18 PM

बिग बॉस १५मध्ये यंदा तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करन कुंद्रा, ईशान सहगल आणि सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार दिसणार आहेत.

'बिग बॉस' चा सिझन १५ ला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे स्पर्धकांनी धमाकेदार डान्सने सुरुवात केली. मात्र यावेळी घरात एंट्री करणारा पहिला स्पर्धक ठरला तो जय भानुशाली. यंदाचे घरही या सिझनचे आकर्षण आहे. यावेळी जंगल थीम असलेले घरात एंट्री करताना जय भानुशाली फार एक्सायडेट दिसला.

फुल ऑन कॉन्फीडन्सने घरात एंट्री करणाऱ्या  जय भानुशालीची भेट सलमान खानसह झाली. मुळात आजपर्यंत झालेल्या १४ सिझनमध्ये सलमानने कधीच कोणत्या स्पर्धकाची घरात पहिली भेट घेतली नव्हती.त्यामुळे जे आपर्यंत घडले नव्हते. ते यावेळी पाहायला मिळाली. स्वतःहून सलमानने जय भानुशालीची भेट घेत त्याच्यात असलेल्या क्वॉलिटी जाणून घेतल्या. इतकंच नाहीतर आजपर्यंत झालेले सिझन हे जास्त कठीण नव्हते. मात्र यंदाचा सिझन हा दिसतो तितका सोपा नाही.

१४ सिझनपेक्षाही जास्त कठीण हा सिझन असल्याचे सांगत जय भानुशालीला सांगितले. सलमानकडून यंदाच्या सिझनची वैशिष्ट्य ऐकल्यानंतर जय भानुशालीच्या चेह-यावर मात्र वेगळेच भाव उमटले होते. तुर्तास घरात सदस्यांची एंट्री तर झालीय. त्यामुळे हा सिझन आगामी भागात कितपत रंजक ठरणार आणि कशारितीने हा सिझन हटके असणार हे पाहणे रंजक असणार आहे. 

या वेळी घराचे डिझाईन फिल्ममेकर ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता ओमुंग कुमार यांनी डिझाइन केले आहे. जंगल ही युनिक थीम असलेल्या घरात स्पर्धक अर्थात प्राण्यासारखेही राहवे लागणार आहे. प्रत्येक वेळी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांना लक्झरी लाईफ जगण्याची संधी मिळते, परंतु यावेळी असे होणार नाही तर जंगलात जसे राहावे लागते अगदी त्याप्रकारे राहावे लागणार आहे. त्यामुळे सेलिब्रेटी स्पर्धक जे आता प्राणी म्हणून ४ महिने या घरात राहणार ते कितपट टिकून राहतात हे पाहणे रंजक असणार आहे. 

बिग बॉस १५मध्ये यंदा तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करन कुंद्रा, ईशान सहगल आणि सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार दिसणार आहेत.

टॅग्स :सलमान खानजय भानुशाली