Join us

'स्पर्धा करायला जातोय, मनं जिंकायला नाही'; अभिजीत बिचुकलेंनी केला game on

By शर्वरी जोशी | Updated: November 21, 2021 19:21 IST

Bigg boss 15: गेल्या कित्येक दिवसांपासून स्पर्धकांची प्रेमप्रकरणं आणि टास्क खेळण्याची पद्धत यामुळे हा शो चर्चिला जात होता. परंतु, आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस (bigg boss). सध्या या शोचं १५ वं पर्व सुरु असून हे पर्व सुरु झाल्यापासून विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून स्पर्धकांची प्रेमप्रकरणं आणि टास्क खेळण्याची पद्धत यामुळे हा शो चर्चिला जात होता. परंतु, आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. 'बिग बॉस मराठी 2' (bigg boss marathi 2) गाजवलेले अभिजीत बिचुकले (abhijit bichuakle) बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाल आहेत. या निमित्ताने त्यांनी लोकमत ऑनलाइनला मुलाखत दिली आहे. यावेळी "घरातील स्पर्धकांसोबत स्पर्धा करायला जातोय, त्यांची मन जिंकायला नाही", असं म्हटलं आहे.

अलिकडेच कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होत असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे सध्या मी घरात कोणाचीही मन जिंकण्यासाठी जात नाहीये. ते माझे प्रतिस्पर्धी असल्यामुळे मी या घरात जातोय. मन तर मी प्रेक्षकांची जिंकणार असं ते म्हणाले आहेत.

"मी या शोमध्ये देशातल्या लोकांची मनं जिंकायला जातोय. घरातील स्पर्धकांची मनं जिंकण्यासाठी नाही. त्यामुळे मी घरात जातोय ते स्पर्धकांशी स्पर्धा करायला," असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

दरम्यान, अभिजीत बिचुकले बिग बॉस १५ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करत आहेत. त्यांच्यासोबत रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्जीनेदेखील वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी २ गाजवणारे अभिजीत बिचुकले बिग बॉस १५ मध्ये नेमका कशा प्रकारे गेम खेळतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :अभिजीत बिचुकलेटिव्ही कलाकारबिग बॉस