Join us

मास्टर माइंड विकास गुप्तावर आहे कोटींचे कर्ज, प्रॉपर्टी वादामुळे कुटूंबानेही केले दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 11:18 IST

घरातल्या स्पर्धकांसह तो त्याचे मनमोकळे करत असतानाच त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्यावर १.८ कोटींचे कर्ज आहे. कर्जात बुडालेला विकास गुप्ताची झोपही उडाली आहे.

मास्टरमाइंड समजला जाणारा विकास गुप्ता यंदाच्या बिग बॉस १४ सिझनमध्ये त्याचे वेगळेच रुप पाहायला मिळत आहे. एरव्ही सगळ्यांत स्टॉंग कंटेस्टंट म्हणून त्याच्याकडे पाहिले जायचे मात्र सध्या विकास घरात खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळतं. छोट्या छोट्या गोष्टींवरु विकास रडताना दिसतो. गेल्याच आठवड्यात त्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो घराबाहेरही आला होता. डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो पुन्हा शोमध्ये परतला आहे. शोमध्येही तो गोळ्या घेताना दिसतो. मानसिकदृट्याही तो खूप खचल्याचे पाहायला मिळते. 

घरातल्या स्पर्धकांसह तो त्याचे मनमोकळे करत असतानाच त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्यावर १.८ कोटींचे कर्ज आहे. कर्जात बुडालेला विकास गुप्ताची झोपही उडाली आहे. इतकी मोठी रक्कमची परतफेड कशी होणार यामुळेच त्याचे जगणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तो 'बिग बॉस १४' मध्ये पुन्हा एकदा सहभागी झाला आहे. शो जिंकेन नाही जिंकेन याची त्याला आता अजिबात काळजी नसल्याचे तो म्हणतो. या दरम्यान त्याने अनेक धक्कादायक गोष्टींचाही खुलासा केला आहे. कुटुंबापासूनही विकास आज दूर झाला आहे. कुटुंबाला केवळ विकास गुप्ताची प्रॉपर्टी हवी आहे. 

विकासने सांगितले की, कुटुंबामुळे त्यांच्या आयुष्यात दुसरा कोणीही त्याचा जवळचा हक्काचा माणूस नाहीय. कदाचित कुटूंबालाही तेच हवे होते कारण जर विकास गुप्ताने लग्न केले असते. त्यांना मुलंच झाली नसती तर  सर्व प्रॉपर्टी त्यांच्याच नावावर असेल. प्रॉपर्टीमुळेच कुटुंबाने विकासला एकटं सोडले आहे. 

कर्जामुळे त्याने त्याच्या आईला नाईलाजाने मेडिकल ट्रीटमेंटसाठीही मदत करण्यास नकार दिला होता. कर्जामुळेच विकासवर त्याचा फ्लॅट विकण्याचीही वेळ आली आहे. म्हणून त्याने त्याच्या आईला उत्तराखंडची विकासच्या नावे असलेली प्रॉपर्टी विकण्यास सांगितले होते.

 

मात्र विकासच्या आईने यावर काहीही उत्तर न देता टाळाटाळ केली आणि सध्या ट्रीपवर असल्याचे सांगत विकासला टाळले. पैस्यांची चणचण असल्यामुळे बिग बॉस शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :बिग बॉस १४