Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14 Winer:पूर्वी अशी दिसायची रुबीना दिलैक, फोटो पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 20:42 IST

 रुबीना दिलैकचा सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री  रुबीना दिलैकच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

 

रुबीना दिलैक तिच्या ब्युटी विथ ब्रेन अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. 'बिग बॉस 14'  मध्येही याची प्रचिती आली.  त्यामुळेच 'बिग बॉस14' ची विजेती बनली. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. मात्र जुने फोटोही तितकेच व्हायरल होत असून ते फोटो पाहून चाहतेही आवाक होत आहेत.

रुबीना छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिन  अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत रसिकांची पसंती मिळवली आहे. आज ती सा-यांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. तिनं 'छोटी बहू' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. रुबीना  'शक्तिः अस्तित्व के अहसास की', 'बनू मैं तेरी दुल्हन', 'पवित्र रिश्ता', 'कसम से', 'पुनर्विवाह-एक नई उम्मीद', 'देवों के देव महादेव' यासारख्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

रुबीना अभिनयासोबतच मॉडलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. तिनं मिस शिमला 2006 आणि मिस नॉर्थ इंडिया 2008 हे किताबही आपल्या नावी केले आहेत. 

टॅग्स :बिग बॉस १४