Join us

Bigg Boss 14: काय सांगता ? फिनालेपूर्वीच सलमान खानने सोडला शो? हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार होस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:29 IST

'बिग बॉस' शोला एक्सटेन्शन मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या शोचा 8 वा आणि १३ वा सीझन सुद्धा अशाचप्रकारे वाढवण्यात आला होता. शोची लोकप्रियता इतकी वाढली होती की,एका महिन्यासाठी शो वाढवण्यात आला होता.

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’ मधील हाय व्होल्टेज ड्रामा वाढत असताना चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी आहे.यावेळी सलमान खान विकेंड का वार स्पेशल एपिसोडमध्ये दिसणार नाहीत. शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी सलमान या शोमध्ये झळकतो. मात्र या एपिसोडमध्ये सलमानची जागा 'सिंघम' दिग्दर्शक अर्थात रोहित शेट्टी यंदा घरातल्या स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. रोहित शेट्टीची या निमित्ताने या शोमध्ये एंट्री होणार आहे. मात्र दुसरीकडे वेगळ्याच गोष्टींचेही तर्कवितर्क लावले जात आहे. याआधी झालेला विकेंड का वार एपिसोड सिद्धार्थ शुक्लाने होस्ट केला होता.  

एरव्ही 'सलमान' आणि 'बिग बॉस' हेच जणू काही समीकरण बनले होते. मात्र फिनाले होण्यापूर्वीच सलमानने शो सोडला असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच फिनाले येण्याआधीच सलमान आऊट तर रोहित शेट्टीची एंट्री झाल्याचे बोलले जात आहे. आता या सगळ्यांमध्ये नेमकी सत्यता काय याबाबच आत्ताच सांगणे कठीण असून वेळ आल्यावर सगळ्याच गोष्टी रसिकांसमोर स्पष्ट होतील.

सलमान खान 'वीकेंड का वॉर'मध्ये न दिसल्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये नाराजी तर असेलच त्याचबरोबर घरातील स्पर्धकांमध्येही नाराजी पाहायला मिळेल. त्याचबरोबर काहींचे म्हणणे आहे की, सलमान खानने निर्मात्यांशी केलेला करार संपला आहे, ज्यामुळे त्याने शोला बाय म्हटले आहे. दरम्यान, या घराला नवीन  कॅप्टन मिळणार आहे. हा कॅप्टन इतर कोणी नसून ती असणार आहे  राखी सावंत. विकास गुप्ताने राखीला घराचा कॅप्टन व्हावी म्हणून तिला जास्त सपोर्ट केला होता. 

'बिग बॉस' शोला एक्सटेन्शन मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या शोचा 8 वा आणि १३ वा सीझन सुद्धा अशाचप्रकारे वाढवण्यात आला होता. शोची लोकप्रियता इतकी वाढली होती की,एका महिन्यासाठी शो वाढवण्यात आला होता. आणि त्यावेळीही डेट बुक असल्याने सलमानला हा शो सोडावा लागला होता. त्यानंतर सलमानच्या जागी फराह खानने हा शो होस्ट केला होता. 

टॅग्स :सलमान खानरोहित शेट्टी