Join us

Video : ‘बिग बॉस 14’च्या घरात राखी सावंतला भुतानं  झपाटलं? जास्मीन,अर्शीची भीतीने उडाली गाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 15:04 IST

सध्या राखीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय आणि ते पाहून बिग बॉसच्या घरातील सर्वांना अक्षरश: धडकी भरली आहे.

ठळक मुद्देआता राखी हे केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी करतेय की हा तिचा कोणता छुपा टास्क आहे की तिला भुताटकीची बाधा झालीय, हे तर एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल.

बेताल  वक्तव्यांमुळे राखी सावंत कायमच चर्चेत असते. कधी चित्रविचित्र दावे करत राखी कायम प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करते.  सध्या ही ड्रामा क्वीन ‘बिग बॉस 14’च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. तिचे बिग बॉसच्या घरातील वाद, तिचा वेडेपणा पाहून घरातील स्पर्धकांनाही अनेकदा हसू अनावर होते. सध्या राखीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय आणि ते पाहून बिग बॉसच्या घरातील सर्वांना अक्षरश: धडकी भरली आहे. जास्मीन आणि अर्शीची तर पुरती बोबडी वळलीये.

होय, राखीचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यात राखी चित्रविचित्र हरकती करताना दिसतेय. स्वत:ला आरशात बघून ती स्वत:शी बोलतेय. व्हिडीओत, काय तू राखी आहेस? तुला याचबरोबर राहायचे आहे? असे अर्शी तिला विचारते. यावर राखी फक्त मान हलवून हो म्हटले. राखी बाथरूम एरियात स्वत:शी बोलताना पाहून जास्मीन प्रचंड घाबरते. राखी काय करतेय? असे ती राखीला विचारते. मात्र राखी तिला उत्तर न देता केवळ शून्यात एकटक बघत राहते. 2020 वर्षाबद्दल मी आनंदी नाही. ही माझी जागा आहे, असे बडबडताना ती दिसते.

आता राखी हे केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी करतेय की हा तिचा कोणता छुपा टास्क आहे की तिला भुताटकीची बाधा झालीय, हे तर एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल.

राखी सावंतचा अनामिक नवरा आला समोर...

 बिग बॉस सोबत राखी पर्सनल लाइफशी निगडीत रहस्यामुळे चर्चेत आली आहे. हे रहस्य म्हणजे राखीचे लग्न. राखी आतापर्यंत दावा करत आली आहे की ती विवाहीत आहे. पण आतापर्यंत कुणीच तिच्या नवऱ्याला पाहिले नाही आणि राखीदेखील कधी आपल्या नवऱ्यासोबत दिसली नाही. बिग बॉसच्या घरात राखीने या गोष्टीचा उल्लेख केला की ती विवाहित आहे आणि तिचा नवरा परदेशात राहतो. यादरम्यान राखी सावंतचा नवरा ज्याला आतापर्यंत कुणी पाहिले नव्हते तो सर्वांसमोर आला आहे.

राखी सावंतचा नवरा रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी बातचीत केली. त्याने सांगितले की, 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझे लग्न आतापर्यंत लपवून ठेवले होते, ही माझी चूक होती. मला असे वाटायचे की मी राखीशी माझी ओळख असणे आणि मी राखीशी लग्न करणे हे जर जगाला समजले तर माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील. मी तिला माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगतो. माझ्या निर्णयामुळे ते आमचे लग्न लपवून ठेवण्यात आले होते. राखीनेही मला या निर्णयात साथ दिली. मला तिचा अभिमान वाटतो. पण आता मला एक संधी मिळाली आहे, मी ठरवले आहे की मी सर्वांसमोर येईन आणि माझी ओळख सगळ्यांना सांगेन. मी माझा फायदा तोटा बघणार नाही. माझे आणि राखीचे सत्य सर्वांना सांगेन.'

टॅग्स :बिग बॉस १४राखी सावंत