Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडताच विकास गुप्ता आला रस्त्यावर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 15:20 IST

‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडल्या पडल्या विकास गुप्ताने असे काही फोटो शेअर केलेत, की ते पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.

ठळक मुद्दे‘बिग बॉस 14’मध्ये विकास गुप्ता व एजाज खानची प्रॉक्सी बनून आलेल्या देवोलिनाला सर्वात कमी मते मिळाली होती.

मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणारा विकास गुप्ता नुकताच ‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडला. बिग बॉसच्या घरात विकासने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केलेत. बॉयसेक्शुअल असल्याची कबुलीत्याने या शोमध्ये दिली. शिवाय आईसोबतच्या वादावरही तो बोलला. विकास गुप्ताची आर्थिक स्थिती चांगली नाही. किंबहुना पैशासाठीच तो ‘बिग बॉस 14’मध्ये आला होता, हेही शोमध्ये दिसले होते. अशात ‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडल्या पडल्या विकास गुप्ताने असे काही फोटो शेअर केलेत, की ते पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.या फोटोंमध्ये विकास गुप्ता रस्त्यावर डिवाइडरच्या मधोमध बसलेला दिसतो. हा फोटो मुंबईच्या मलाड भागात क्लिक केलेला आहे. सुरुवातीला विकासचे हे फोटा पाहून त्याच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसला. पण पोस्ट वाचल्यानंतर विकास जिममध्ये घाम गाळून आल्यानंतर रस्त्यावर रिलॅक्स होत असल्याचे चाहत्यांना कळले.

‘वर्कआऊटनंतरचा ग्लो... ‘बिग बॉस 14’नंतर आयुष्य सुरु...’, असे कॅप्शन हे फोटो शेअर करताना विकास गुप्ताने दिले आहे.‘बिग बॉस 14’मध्ये विकास गुप्ता व एजाज खानची प्रॉक्सी बनून आलेल्या देवोलिनाला सर्वात कमी मते मिळाली होती. अशात विकास गुप्ताकडे जोकर कार्ड वापरून घरात राहण्याची संधी होती.  

हे कार्ड वापरून विकासने घरात राहण्याचा निर्णय घेतला असता तर एजाज खान ‘बिग बॉस 14’मधून कायमचा बाहेर झाला असता. मात्र विकासने प्रेक्षकांच्या निर्णयाचा सन्मान करत, घरातून बाहेर आण्याचा निर्णय घेतला. गत रविवारी तो घरातून बाहेर पडला. यानंतर सोशल मीडियावर सर्वांनी त्याचे कौतुक केले होते.

टॅग्स :बिग बॉस १४