Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दिशाचा सूट घातलास का? राहुल वैद्यचा अनारकली स्टाईल कुर्ता पाहून फॅन्स झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 13:35 IST

कालपरवा राहुल मित्राच्या लग्नात सामील झाला. या लग्नासाठी त्याने असा काही लुक निवडला की, तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.

ठळक मुद्देयाआधी राहुलने बिग बॉस 14 ची विजेती रूबीना दिलैक हिचा लूक कॉपी केला होता. यावरूनही तो असाच ट्रोल झाला होता.

‘बिग बॉस 14’ संपल्यानंतर राहुल वैद्य त्याच्या आयुष्यात बिझी झालाय. पण म्हणून त्याची चर्चा कमी नाही. आता काय तर राहुलच्या एका लुकची जोरदार चर्चा रंगलीये. तर राहुल कालपरवा मित्राच्या लग्नात सामील झाला. या लग्नासाठी त्याने असा काही लुक निवडला की, तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.या लग्नात राहुल वैद्य क्रिम कलरचा अनारकली कुर्ता व चूडीदार पायजामा, सोबत स्टायलिश जॅकेट अशा रॉयल लूकमध्ये पाहोचला. या आऊटफिटमध्ये राहुलने मस्तपैकी पोजही दिल्यात. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि मग काय, अनेकांनी या कपड्यांवरून राहुलला ट्रोल केले.

राहुलने रणवीर सिंगला कॉपी केल्याचा आरोप युजर्सनी केला. तुम्हाला आठवत असेलच की, रणवीरने त्याच्या मेहंदी सेरेमनीत असाच अनारकली कुर्ता घातला होता. यानंतरही अनेक इव्हेंटमध्ये रणवीर अनारकली कुर्ता घालून दिसला आहे. मग का, राहुलला अशाच पोशाखात पाहून युजर्सनी त्याची खिल्ली उडवणे सुरु केले.

दिशाचा सूट का घातला? असा मजेदार प्रश्न एका युजरने त्याला केला. फ्रॉकमध्ये चांगला दिसतोय, असे म्हणत एका युजरने त्याची मजा घेतली.

याआधी राहुलने बिग बॉस 14 ची विजेती रूबीना दिलैक हिचा लूक कॉपी केला होता. यावरूनही तो असाच ट्रोल झाला होता.‘इंडियन आयडल’ शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने अभिनयात सुद्धा नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 

टॅग्स :राहुल वैद्यबिग बॉस १४