Join us

Bigg Boss 13 : पुन्हा एकदा एन्ट्री करणार हा कंटेस्टंट, यामागचं हे आहे ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:11 IST

बिग बॉस १३मध्ये नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे

बिग बॉस १३मध्ये नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये कंटेस्टंट देवोलीन भट्टाचार्जी पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे. या शोमधील शेवटच्या आठवड्यात खूप ट्विट्स पहायला मिळणार आहे. आता शोमध्ये घरातल्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे फॅमिली मेंबर्स व फ्रेंड्स एन्ट्री करणार आहेत. चाहते हे पाहण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत की घरात नवीन लोक आल्यामुळे शोमध्ये काय धमाल पहायला मिळणार आहेत.

नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार स्पर्धकांच्या घरातल्यांसोबत सीझन १३ची एक्स कंटेस्टंट्स देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा शोमध्ये एन्ट्री करणार आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, देवोलीना बिग बॉसच्या घरात तिची बेस्ट फ्रेंड रश्मी देसाईला पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे.

रिपोर्टनुसार देवोलीना फक्त ४ दिवसांसाठी घरात राहणार आहे. सूत्रांनी स्पॉटबॉयला सांगितलं की, वाहिनी देवोलीनाला शोमध्ये घेण्यासाठी खूप उत्सुक होते. त्यामुळे चॅनेलने देवोलीनाला रश्मीच्या फॅमिलीच्या जागी शोमध्ये एन्ट्री करण्यासाठी विचारलं आहे. त्यासाठी तिला जास्त मानधनही दिले जात आहे. दुखापत झाल्यामुळे शो मध्येच सोडावा लागला होता. त्यामुळे चाहते खूप नाराज झाले होते. मात्र आता देवोलीनाला पुन्हा एकदा घरात पाहून चाहते खूश होणार आहेत.

बिग बॉस शोच्या प्रोमोमध्ये दाखवलं गेलं की असीमला सपोर्ट करण्यासाठी हिमांशी खुराना पुन्हा एकदा घरात एन्ट्री करणार आहे. सिद्धार्थला सपोर्ट करण्यासाठी मास्टरमाइंड विकास गुप्ता येणार आहे.

तर आरतीला पाठिंबा देण्यासाठी तिची वहिनी कश्मीरा शाह व शहनाजचा भाऊ शहबाज बहिणीला सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये दाखल होणार आहेत.

टॅग्स :बिग बॉसदेवोलिना भट्टाचार्जीरश्मी देसाई