Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 12 Winner: दीपिका कक्कर ठरली विजेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 23:09 IST

छोट्या पडद्यावरील रियलिटी शो 'बिग बॉस- १२' या सीझनची विजेती ठरली दीपिका कक्कर इब्राहिम.

ठळक मुद्दे'बिग बॉस- १२' या सीझनची विजेती ठरली दीपिका कक्कर इब्राहिमदीपिकासह श्रीसंत,दीपक ठाकुर यादोघांच्याही विजेत्याच्या शर्यंतीत होते. 'बिग बॉस' या रियालिटी शोच्या विजेत्यांना ट्रॉफी आणि ५० लाख रुपये देण्यात येते

छोट्या पडद्यावरील रियलिटी शो 'बिग बॉस- १२' या सीझनची विजेती ठरली दीपिका कक्कर इब्राहिम. दीपिकासह श्रीसंत, दीपक ठाकुर या दोघांच्याही विजेत्याच्या शर्यंतीत होते. मात्र यांना मागे टाकत दीपिकाने बाजी मारली असल्याची चर्चा सुरू आहे. उपविजेत्या पदावर श्रीसंत, दीपक ठाकुर यांना समाधान मानावे लागल्याचे बोलले जात आहे. सुमारे १०० दिवसांहून अधिक काळ बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर बिग बॉस-१२च्या विजेतेपदासाठी अंतिम फेरीत घरातील पाच सदस्य पोहोचले होते. माजी क्रिकेटर श्रीसंत, दीपक ठाकुर, करणवीर व्होरा, दीपिका आणि रोमिल यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम सामना झाला.

यात प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर दीपिकाने  बाजी मारली. तीन महिन्याहून अधिक काळ कुटुंबीय आणि घरापासून दूर राहिलेल्या या स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घरातील प्रवास तितकासा सोपा नव्हता. विविध टास्क, बिग बॉसच्या घरात सहकारी सदस्यांसोबत उडणारे वाद, टोकाची भांडण असं सारं प्रेक्षकांनी अनुभवलं. बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद यावरून प्रेक्षकांनी बिग बॉस-१२ च्या विजेतीची निवड केली आहे. 'बिग ब्रदर' या रियालिटी शोवर आधारित 'बिग बॉस' या रियालिटी शोच्या विजेत्यांना ट्रॉफी आणि ५० लाख रुपये देण्यात येते. शानदार अंतिम फेरीच्या वेळी धमाकेदार परफॉर्मन्सही सादर झाले.

टॅग्स :बिग बॉस 12दीपिका कक्करश्रीसंतदीपक ठाकुर