Join us

Bigg Boss 12 : हा स्पर्धक ठरला विजेता, सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:54 IST

सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे.

ठळक मुद्देबिग बॉस या कार्यक्रमाचा फिनाले जवळ आला की, विजेता कोण ठरला आहे याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते. क्रिकेटर श्रीसंत विजेता असल्याची चर्चा रंगल्यानंतर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले आहे. श्रीसंतच्या पत्नीने ट्वीटर या सोशल नेटवर्किंग साईटवर ट्वीट करत लिहिले आहे की, बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांच्या चाहत्यांची असुरक्षितता पाहा. ते अफवा पसरवत आहेत.

बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडता आहे. या कार्यक्रमाचा सध्या 12 वा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. बिग बॉस या कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन प्रेक्षक डोक्यावर घेतात. पण यंदाच्या सिझनला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. पण तरीही या कार्यक्रमातील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. त्यामुळे आपलाच आवडता स्पर्धक विजेता ठरावा असे त्यांच्या फॅन्सना वाटत आहे.  

सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. या स्पर्धकांमध्ये तीन सेलिब्रेटी आणि तीन कॉमनर असून दीपिका कक्कर आणि श्रीसंत या दोघांपैकी एक जण या कार्यक्रमाचा विजेता बनला असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. श्रीसंत, दीपिका कक्कर, करणवीर बोहरा हे सेलिब्रेटी तर दीपक ठाकूर, सुरभी राणा आणि रोमील चौधरी या कॉमनर्स मध्ये हा सामना रंगणार आहे. 

बिग बॉस या कार्यक्रमाचा फिनाले जवळ आला की, विजेता कोण ठरला आहे याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते. क्रिकेटर श्रीसंत विजेता असल्याची चर्चा रंगल्यानंतर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले आहे. श्रीसंतच्या पत्नीने ट्वीटर या सोशल नेटवर्किंग साईटवर ट्वीट करत लिहिले आहे की, बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांच्या चाहत्यांची असुरक्षितता पाहा. ते अफवा पसरवत आहेत. तुम्ही अफवा पसरवत राहा. कारण एखादी गोष्ट सतत बोललल्यानंतर ती सत्य होते असे मला वाटते. श्रीसंतने हाफ सिझनसाठी किंवा केवळ काही महिन्यांसाठी बिग बॉस हा कार्यक्रम साईन केला नव्हता. आपल्या इनसिक्युरिटीबाबत तुम्ही शांतच बसा...

बिग बॉस 12 चा विजेता कोण ठरला हे आपल्याला लवकरच कळेल. 

 

टॅग्स :बिग बॉस 12श्रीसंतदीपिका कक्कर