Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 12 : करणवीर बोहराच्या मुलीने त्याच्यासाठी शेअर केला हा क्यूट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 21:00 IST

बिग बॉसच्या घरात सध्या करणवीर बोहरा असून तो या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त मिस त्याच्या पत्नीला आणि त्याच्या दोन मुलींना करत आहे. त्याच्या मुली या अतिशय लहान असून त्या दोघी देखील आपल्या वडिलांना मिस करत आहेत.

बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांचा तीन महिने तरी त्यांच्या घरातल्यांशी काहीही संपर्क नसतो. त्यांना आपल्या कुटुंबियाशी बोलण्याची संधी देखील मिळत नाही. त्यामुळे सगळेच स्पर्धक घरात आपल्या कुटुंबियांना मिस करत असतात. बिग बॉसच्या घरात सध्या करणवीर बोहरा असून तो या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त मिस त्याच्या पत्नीला आणि त्याच्या दोन मुलींना करत आहे. त्याच्या मुली या अतिशय लहान असून त्या दोघी देखील आपल्या वडिलांना मिस करत आहेत.

करणवीर बोहराने शरारत, क्योंकी साँस भी कभी बहू थी, जस्ट मोहोब्बत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे... या मालिकेत त्याने साकारलेली प्रेमची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच नच बलिये, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील तो झळकला आहे. त्याचे लग्न मॉडेल तीजे सिंधूसोबत २००६ मध्ये झाले असून त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. त्यांची नावे बेला आणि विएना अशी असून त्या दोघी केवळ २३ महिन्यांच्या आहेत. करणवीर बिग बॉसच्या घरात गेल्यापासून त्या दोघी त्याला खूपच मिस करत आहेत. करणवीरशिवाय या दोघींनाही कधीही राहाण्याची सवय नसल्याने त्यांना सांभाळणे मला खूप कठीण जाणार आहे असे करणवीरची पत्नी तीजेने बिग बॉस कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच सांगितले होते. 

तीजेने नुकताच इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत आपल्याला तिच्यासोबत विएनाला पाहायला मिळत आहे. विएनाने या व्हिडिओद्वारे तिच्या वडिलांना एक खास संदेश दिला आहे. या व्हिडिओसोबत तीजेने एक कॅप्शन दिली आहे आणि त्यात म्हटले आहे की, आपल्या मुलीला आता कसे वाटत आहे हे बहुधा तिला देखील कळत नाहीये. ती तुला खूप मिस करत असली तरी ते कसे सांगायचे हेच तिला कळत नाहीये. 

तीजेने हा व्हिडिओ शेअर केला असून अनेकांनी हा लाइक केला आहे. तसेच यावर खूपच छान प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

टॅग्स :बिग बॉस 12करणवीर बोहरा