Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतच्या नाही तर या व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:50 IST

Bhushan Pradhan: भूषणने पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हा खुलासा केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. बऱ्याचदा तो त्याच्या फिटनेस आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत येतो. मात्र आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तो पूजा सावंतसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. कारण भूषणने पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हा खुलासा केला आहे. 

भूषण प्रधानचे नाव आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, भाग्यश्री लिमये यांच्यासोबत तो बऱ्याचवेळा स्पॉट झालेला पाहायला मिळाला. पूजा सावंत, भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी यांची मैत्री सर्वांना माहीत आहे. मात्र पूजा सावंत सोबत तो रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण भूषणने पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हा खुलासा केला आहे.

भूषण प्रधान ज्या मुलीला डेट करत आहे तिचे नाव आहे वैशाली महाजन. वैशाली महाजन आणि भूषण प्रधान यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोंवर मराठी विश्वातील सेलिब्रिटींनी देखील दोघांना शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

भूषणची गर्लफ्रेंड वैशाली ही देखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. रचना संसद कॉलेजमधून वैशालीने फाईन आर्टसचे शिक्षण घेतले. गेल्या ५ वर्षांपासून ती आर्ट डायरेक्टर म्हणून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. याच माध्यमातून भूषण आणि वैशालीशी ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. वैशालीने अनेकदा भूषण सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळत आहेत.  त्यामुळे आता भूषण आणि वैशाली हे दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

टॅग्स :भुषण प्रधानपूजा सावंत