Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूषण प्रधान या अभिनेत्रीला करतोय डेट?, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:55 IST

अभिनेता भूषण प्रधान सध्या टेलिव्हिजनवरील एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अफेयर्स आणि ब्रेकअपच्या चर्चा बऱ्याचदा रंगत असतात. अशीच एका अफेयर्सची चर्चा नुकतीच ऐकायला मिळते आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता भूषण प्रधान सध्या टेलिव्हिजनवरील एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ही अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर अभिनेता भूषण प्रधान भाग्यश्री लिमयेला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे.

अभिनेता भूषण प्रधान अभिनेत्री भाग्यश्री लिमयेला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भाग्यश्री लिमये ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने घाडगे & सून या मालिकेत काम केले होते आणि या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. 

अभिनेता भूषण प्रधान या अभिनेत्यासोबत सध्या भाग्यश्री लिमये डेट करत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर आहे. त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एवढेच नव्हे तर भाग्यश्रीच्या वाढदिवसाला भूषणने भाग्यश्रीचा फोटो शेअर करून खास पोस्ट देखील लिहिली होती. मी किती खास आहे... हे सांगण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाही तू जशी आहेस तशीच राहा.. असे भूषणने या पोस्टमध्ये म्हटले होते.

त्यावर भाग्यश्री म्हणाली तू नेहमीच माझा वाढदिवस स्पेशल बनतोस. त्यामुळे ते दोघे एकमेकांसाठी किती खास आहेत, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

मराठी सिनेसृष्ट्रीतील हंडसम हंक अभिनेता अशी भूषण प्रधानची ओळख आहे. 'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या भूषण स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणाऱ्या जय भवानी जय शिवाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानभाग्यश्री लिमेय