Join us

Bhumi Pednekar Video : बेटा भूमी, तू उर्फीची...., दिवाळी पार्टीतील भूमी पेडणेकरचा लुक पाहून भडकले फॅन्स...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 15:37 IST

Bhumi  Pednekar :  सोनम कपूरने दिवाळीनिमित्त तिच्या घरी एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. भूमी पेडणेकरही या पार्टीत पोहोचली. पण...

भूमी पेडणेकर (Bhumi  Pednekar) बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या फॅशन सेन्सने तिने अनेकदा चाहत्यांना इम्प्रेस केलं आहे. बॉलिवूड कलाकारांच्या दिवाळी पार्ट्यांमधील भूमीच्या लुकनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. पण सोनम कपूरच्या दिवाळी पार्टी भूमीचा लुक पाहून चाहते भडकले. अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोनम कपूरने दिवाळीनिमित्त तिच्या घरी एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. भूमी पेडणेकरही या पार्टीत पोहोचली. पण तिचा बोल्ड लुक चाहत्यांना फार काही आवडला नाही.

सोनम कपूरच्या पार्टीसाठी भूमीने पांढऱ्या रंगाची स्टायलिश साडी निवडली. पण यावरचं ब्लाऊज इतकं रिविलिंग होत की, भूमी लगेच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. भूमीचा हा अवतार पाहून अनेकांनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने भूमीचा पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आणि लोकांनी भूमीला ट्रोल करायला सुरूवात केली. किमान देवाचं नाव घेत असताना तर चांगले कपडे घाला, असं एका युजरने तिला सुनावलं. ही कधीच चांगली दिसू शकत नाही, काहीही अवतार करते, अशी कमेंट एका युजरने केली. अनेकांना भूमीला पाहून उर्फीची आठवण झाली. बेटा भूमी, उर्फीकडून काहीही शिकण्याचा प्रयत्न करू नकोस, तू तुझं कर, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती अखेरीस अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’मध्ये झळकली होती. सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.लवकरच ती गोविंदा नाम मेरा या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय भीड, भक्षक, द लेडी किलर, अफवाह, थँक यू फॉर कमिंग या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

टॅग्स :भूमी पेडणेकर बॉलिवूडसोनम कपूरदिवाळी 2022