Join us

कार्तिक आर्यनच्या 'पती, पत्नी और वो 2'मध्ये झळकणार ९० चा काळ गाजवलेली ही ग्लॅमरस अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 12:05 IST

कार्तिक आर्यनच्या आगामी 'पती, पत्नी और वो 2' मध्ये एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झालीय

'पती, पत्नी और वो' सिनेमा २०१९ साली आलेला. सिनेमाचा कॉमेडी जॉनर याशिवाय कार्तिक आर्यन आणि इतर प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालेलं. या सिनेमाचा सीक्वलची घोषणाही काही दिवसांपूर्वी करण्यात आली. पुन्हा एकदा सिनेमात कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत खुलासा करण्यात आलाय. जाणून घ्या.

९० चा काळ गाजवणारी ही अभिनेत्री झळकणार

कार्तिक आर्यनच्या आगामी 'पती, पत्नी और वो 2' सिनेमात अभिनेत्री रविना टंडन झळकणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड हंगामाने याविषयी एक रिपोर्ट केलाय. त्यामध्ये त्यांनी रविना टंडन कार्तिकसोबत 'पती, पत्नी और वो' सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. अद्याप याबाबत अधिकृत खुलासा जाहीर झाला नाहीये. 'पती, पत्नी और वो'च्या पहिल्या भागात कार्तिकसोबत भूमी पेडणेकर, अनन्या पांडे या अभिनेत्री झळकल्या होत्या. आता दुसऱ्या भागात रविना-कार्तिकची जोडी काय धमाल करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

कधी रिलीज होणार 'पती, पत्नी और वो 2'?

कार्तिक आर्यन सध्या 'भूल भूलैय्या ३'मुळे चर्चेत आहे. कार्तिकच्या 'भूल भूलैय्या ३' ने २०० कोटींहून अधिकचा बिझनेस करुन मल्टिस्टारर 'सिंघम अगेन'ला मात केलीय. आता कार्तिकच्या आगामी 'पती, पत्नी और वो 2' ची उत्सुकता शिगेला आहे. सध्या या सिनेमाचं काम प्राथमिक स्तरावर असून पुढील वर्षी मे महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होऊन २०२५ च्या अखेरीस सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनरवीना टंडन