Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 09:07 IST

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही डेंग्यू झाला आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर दोघांनाही रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही डेंग्यू झाला आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर दोघांनाही रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, हर्ष आणि भारती दोघांचीही प्रकृती गत काही दिवसांपासून खराब होती. वैद्यकीय चाचण्यांअंती दोघांमध्येही डेंग्यूची लक्षणे आढळली. डॉक्टरांनी दोघांनाही रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. यानंतर भारती व हर्ष यांना कोकिळाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले. तूर्तास त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक होईपर्यंत दोघांनाही रूग्णालयातचं राहावे लागणार.भारती व हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती. पण शोच्या प्रीमीअरमध्ये भारती-हर्ष दिसले नाहीत. यानंतर आता ही जोडी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डवर एन्ट्री करू शकते, असे मानले जात आहे. तूर्तास तरी यासाठी दोघांनाही लवकर बरे होणे आवश्यक आहे.  स्टार वन चॅनलवरील 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोची भारती सेकंड रनअरप होती. या शोमुळेच प्रकाश झोतात आलेली भारती नंतर अनेक टीव्ही शोमध्ये कॉमेडी स्कीट आणि होस्ट करताना दिसली.'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाईट बचाव', 'झलक दिखला जा'  'इंडियाज गॉट टॅलेंट' अशा विविध रिअॅलिटी शोमध्ये झळकली  आहे. भारती सिंह एक उत्तम कलाकारा कॉमेडी क्विन म्हणूनही ओळखली जाते.हर्ष हा लेखक असून त्याने काही कॉमेडी शोजसाठी लेखक म्हणून काम केले आहे.

टॅग्स :भारती सिंगबिग बॉस 12