Join us

भारती सिंगने दिला मुलीला जन्म.?, या गुड न्यूजबाबत कॉमेडियन म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 13:20 IST

Bharti Singh:भारती सिंग प्रेग्नेंसीच्या संपूर्ण काळात खूप अ‍ॅक्टिव्ह राहिली आहे. इतकेच नाही तर तिने कामालाही अजिबात ब्रेक दिला नाही.

कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) बनली आई! त्यांच्या घरी कन्येचे आगमन झाले आहे! अरे अरे जरा थांबा, एवढं खुश व्हायची गरज नाही. कारण भारती सिंग आई झाल्याची बातमी खरी नाही. सध्या सोशल मीडियावर भारती सिंग आई झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. पण या चर्चांवर अजिबात विश्वास ठेवू नका. 

भारती सिंग अजून आई झालेली नाही. ती अजूनही खतरा खतरा या गेम शोचे शूटिंग करते आहे. आई झाल्याच्या खोट्या बातम्यांवर भारती सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. लाईव्ह चॅटमध्ये भारतीने सांगितले की, मी प्रेग्नंट नाही. जे मला ओळखतात ते मला फोन करून अभिनंदन करत आहेत. मला मुलगी झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण हे खरे नाही. मी खतरा खतरा शोच्या सेटवर आहे. इथे १५-२० मिनिटांचा ब्रेक आहे, त्यामुळे मला वाटले लाइव्ह येऊन सांगावे की मी अजून काम करते आहे.

भारती म्हणाली की मला भीती वाटते. माझी डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे. हर्ष आणि मी बाळाबद्दल बोलतो. भारतीने सांगितले की तिला वाटते की तिचे बाळ खूप मजेशीर असेल कारण ते दोघेही मजेशीर आहेत. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन भारतीने चाहत्यांना केले आहे. ती आणि हर्ष बाळाची बातमी शेअर करणार असल्याचेही तिने चाहत्यांना सांगितले. भारती सिंग केव्हाही आई होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे. तिची डिलिव्हरीची तारीख एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आहे. गर्भधारणेच्या अवस्थेतही भारती पूर्णपणे सक्रिय आहे. ती पती हर्षसोबत 'खतरा खतरा' शो होस्ट करत आहे.

टॅग्स :भारती सिंग