Join us

प्रेग्रेंसी आधीच Bharti Singने केले वेट लॉस, गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:11 IST

कॉमेडी क्वीन भारती सिंग( Bharti Singh) लवकरच आई होणार आहे. नवीन वर्षात २०२२ मध्ये ती बाळाला जन्म देणार

कॉमेडी क्वीन भारती सिंग( Bharti Singh) लवकरच आई होणार आहे. खुद्द भारतीने ही .ती प्रेग्नन्ट असल्याचे सांगितले आहे.नवीन वर्षात २०२२ मध्ये ती बाळाला जन्म देणार आहे.एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारती बाळाला जन्म देणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का,या गुडन्यूजपूर्वी भारतीने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीने काही महिन्यांत 15 किलो वजन कमी केले होते.

भारतीने 6 महिन्यात 15 किलो वजन कमी केले आहे. पहिले भारती सिंगचे वजन 91 किलो होते आता तिने ते 76 किलोवर आणले आहे. एरव्ही जाडजुड दिसणारी भारती तिच्या दिसण्यावर अनेकदा विनोद करत चाहत्यांना खळखळून हसवायची. पण आता भारती पूर्वीसारखी लठ्ठ दिसत नाही. हो, अगदी खरंय स्वतःवर मेहनत घेत आता ती फॅटपासून फिट बनली आहे. फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग बनली आहे.व्यायाम आणि योग्य डाएट करत तिने नवीन लूक मिळवला आहे. त्यामुळे आता ती पूर्वीपेक्षाही सुंदर आणि तितकीच आकर्षक दिसत आहे. तिचा हा नवीन लूक पाहून फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की.

भारती सिंग आणि हर्ष 2017 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर भारतीने आपल्या चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. 

टॅग्स :भारती सिंग