Join us
Daily Top 2Weekly Top 5

2020 मध्ये भारती आणि हर्ष देणार का गुड न्यूज, भारतीनेच सांगितले इंडियन आयडलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:00 IST

इंडियन आयडलमध्ये या आठवड्यात भारती आणि हर्ष हजेरी लावणार आहेत.

ठळक मुद्देरोहितच्या दमदार सादरीकरणानंतर भारतीने ती रोहितची चाहती आहे असे सांगितले. तसेच तिचे बाळ जन्माला येणार तेव्हा त्याने हे गाणे म्हणावे असे तिला वाटते हे देखील सांगितले.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

‘इंडियन आयडल सीझन 11’ मध्ये या आठवड्यात शादी विशेष एपिसोड साजरा केला जाणार आहे. यामध्ये स्पर्धक आजवर चित्रपटात दाखवली गेलेली लग्नातील उत्कृष्ट गाणी सादर करणार आहेत. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारती येणार आहे आणि तिच्यासोबत उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी तिचा पती हर्ष देखील असणार आहे. 

‘इंडियन आयडल’ मधील धमाकेदार गायक रोहित राऊत याने ‘ले जाएंगे ले जाएंगे’ आणि ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यांवर सादरीकरण केले. त्याच्या या सादरीकरणाने परीक्षकांना तसेच विशेष अतिथींना त्याच्याबरोबर थिरकण्यास भाग पाडले. त्याच्या दमदार सादरीकरणानंतर भारतीने ती रोहितची चाहती आहे असे सांगितले. तसेच तिचे बाळ जन्माला येणार तेव्हा त्याने हे गाणे म्हणावे असे तिला वाटते हे देखील सांगितले.

रोहितची प्रशंसा करताना हिमेश म्हणाला, “नेहमीच तू ज्या पद्धतीने गातोस, त्यावरून एखादा स्पर्धक गात आहे यावर माझा विश्वासच बसत नाही तर एखादा प्रसिद्ध गायक गात आहे असेच वाटते. तुझा मंचावरील आत्मविश्वास उल्लेखनीय आहे. भविष्यातील तुझ्या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा.” 

टॅग्स :भारती सिंग