Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 15:17 IST

चित्रपटाचे नाव आहे, ‘निकम्मा’. हा चित्रपट दिग्दर्शक शब्बीर खान दिग्दर्शित करतोय.

ठळक मुद्देभाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने याआधी ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’  या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील सौज्वळ चेह-याची भाग्यश्री बॉलिवूडमधून गायब आहे. पण भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी  बॉलिवूड डेब्यूपासूनच चर्चेत आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून अभिमन्यूचा डेब्यू झाला. अर्थात त्याच्या या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळू शकली नाही. पण समीक्षकांनी या चित्रपटातील अभिमन्यूच्या अभिनयाचे बरेच कौतुक केले. आता याच अभिमन्यूला दुसरा चित्रपट मिळाला आहे. होय, अभिमन्यूच्या दुस-या चित्रपटाचे नाव आहे, ‘निकम्मा’. हा चित्रपट दिग्दर्शक शब्बीर खान दिग्दर्शित करतोय. शब्बीर खानने यापूर्वी अनेक नव्या चेह-यांना लॉन्च केले आहे. आता शब्बीर खान अभिमन्यूचे करिअर सावरताना दिसणार आहेत.

‘निकम्मा’ या चित्रपटात अभिमन्यूसोबत शर्ले सेटिया दिसणार आहे. शर्ले ही युट्यूब सेन्सेशन आहे. युट्यूबवर मिळालेल्या लोकप्रियतेनंतर शर्ले बॉलिवूड डेब्यू करतेय. ‘निकम्मा’ हा  एक मसाला चित्रपट असणार आहे. म्हणजे, अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन असे सगळे काही यात पाहायला मिळेल. चित्रपटाचे फर्स्ट लूकही समोर आले आहे. पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अभिमन्यूचा पहिला चित्रपट ‘मर्द को दर्द नहीं होता’ हा एक सुपरहिरो सिनेमा होता. याला एक दुर्मिळ आजार असतो. असा आजार ज्यामुळे माणसाला कुठल्याही प्रकारच्या वेदना, दु:ख होत नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले. त्यामुळे ‘निकम्मा’ हा दुसरा चित्रपट अभिमन्यूच्या करिअरला किती गती देतो, ते बघूच.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने याआधी ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’  या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. आता तो अभिनेता बनला आहे. पण याचसोबत त्याच्यावर दबावही आहे. स्टारकिड्स असल्याने काहीही फायदा होत नाही. उलट याने तुमच्यावर अधिक प्रेशर निर्माण होते, असे त्याचे मत आहे. आता हे प्रेशर अभिमन्यू कसे आणि किती पेलतो, हे लवकरच कळेल. 

 

टॅग्स :भाग्यश्री