Join us
Daily Top 2Weekly Top 5

Besharam Rang Pathaan : दीपिका 'हॉट अँड बोल्ड'; शाहरुखचा बीचवरचा 'शर्टलेस' लुक पाहून चाहते 'क्लीन बोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:57 IST

पठाणच्या पहिल्या गाण्याचीही प्रत्येकाला उत्सुकता होती. यात दीपिकाचा गोल्डन मोनोकॉनीमधील लुक बघुन चाहते फिदा झाले होते.

Besharam Rang Pathaan : शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि दीपिकाचा (Deepika Padukone) आगामी चित्रपट 'पठाण'ची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाचा टीझर तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे. पठाणच्या पहिल्या गाण्याचीही प्रत्येकाला उत्सुकता होती. यात दीपिकाचा गोल्डन मोनोकॉनीमधील लुक बघुन चाहते फिदा झाले होते. अखेर बहुप्रतिक्षित 'बेशरम रंग' हे पठाणचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. काही वेळातच गाण्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. 

पठाणच्या 'बेशरम' गाण्यात दीपिकाचे बोल्ड रुप बघून चाहते घायाळ झाले आहेत. 'रेस' आणि 'कॉकटेल' या दोन्ही चित्रपटात दीपिकाचा बोल्ड अवतार सर्वांनी बघितला होता. आता अनेक वर्षांनंतर दीपिकाचा पुन्हा बोल्ड लुक बघुन दीपिकाचे फॅन्स जाम खुश झालेत. 'गोल्डन मोनोकॉनी' लुकमध्ये दीपिकावरुन नजरच हटत नाही. 

बीचवर शाहरुखसोबत रोमान्स

'बेशरम रंग' गाण्यात फक्त दीपिकाच नाही तर शाहरुखचेही सरप्राईज आहे.  हे गाणे बीचवर शूट झाले असून दीपिकासोबत शाहरुखचा रोमान्स दिसून येतोय. आधी शाहरुख आणि दीपिका दोघांच्यात दुरुनच नजरानजर होते. नंतर शाहरुखने शर्टलेस होत चाहत्यांना घायाळ केले आहे. 

Shahrukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचं वैष्णोदेवीला साकडं; 'बॉयकॉट'च्या भीतीने मक्केनंतर मंदिरात पोहोचला 'पठाण'!

'पठाण' चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होता आहे. जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर येत आहे.  दीपिका आणि शाहरुखची जोडी पुन्हा एकदा धमाका करणार आहे. तर जॉन अब्राहमही मुख्य भुमिकेत आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणजॉन अब्राहम