मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि तो या माध्यमातून बऱ्याचदा व्यक्त होताना दिसतो. कधी आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्ट्सचे अपडेट देताना दिसतो तर कधी जनजागृती करताना दिसतो. दरम्यान आज त्याने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
शशांक केतकर याने त्याच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो आईला पार्लरमध्ये घेऊन गेला असून तिथे आईच्या केसांना कलर करून छान हेअरकट करून घेतला. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. आई होणं हे सगळ्यात अवघड आहे म्हणूनच तू स्वतःचे लाड कर… करून घे.
शशांकच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ते या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. कलाकारांनीदेखील या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. अभिज्ञा भावेने लिहिले की, क्युटेस्ट व्हिडीओ. मेघा धाडेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, लहानपणी आईने आपल्याला नटवलेलं सजवलेलं असतं, आता आपली पाळी त्यांना पॅम्पर करण्याची. काकूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, असच आईवर कायम करत राहा.तुला कधीच काही कमी पडणार नाही. तर आणखी एकाने लिहिले की, किती छान लहानपणी आई मुलांचे संगोपन करते आणि मुलं मोठी झाल्यावर आईचं मुलं वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करतात. शशांक तर खूप गोड गुणी मुलगा आहे. शशांकच्या आईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एकाने लिहिले की, आपली आई कुटुंबातील सर्वाची जागा घेऊ शकते पण कुटुंबातील कोणीच आईची जागा नाही घेऊ शकत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू.
वर्कफ्रंटशशांक केतकरने नाटक, मालिका, चित्रपट आणि ओटीटी अशा माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात छाप उमटविली आहे. सध्या तो मुरांबा मालिकेत काम करताना दिसतो आहे. त्याने या मालिकेत साकारलेला अक्षय प्रेक्षकांना खूप भावतो आहे.