Join us

विजयच्या आधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपूडा झाला, लग्नही करणार होते पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:59 IST

येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा साखरपुडा उरकरणार असल्याचं सांगितलं जातंय.

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकानं सगळ्यांनाच वेड लावले आहे. जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे ती नॅशनल क्रश झाली आहे. पण, रश्मिकाला वेड आहे ते विजय देवरकोंडाचं. फेब्रुवारी महिन्यात दोघेही साखरपुडा करणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का रश्मिकाचा याआधी साखरपूडा झाला आणि तो मोडलाही होता. 

रश्मिकाने खूप यश मिळवलं, पण ती नेहमीच ती लव्ह लाइफमुळेही चर्चेत राहिली. रश्मिकाने विजयच्या आधी दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीच्या आकंठ प्रेमात बुडाली होती. दोघांनी 'किरिक पार्टी' सिनेमात काम केलं होतं. हळूहळू रश्मिका आणि रक्षित जवळ आले आणि २०१७ मध्ये त्या दोघांनी साखरपुडा केला. मात्र, २०१८ मध्ये दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि ते विभक्त झाले. रश्मिका रक्षित यांच्या ब्रेकअप नंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

यानंतर रश्मिकाच्या आयुष्यात विजय आला.  'गीता गोविंदम' आणि  'डियर कॉमरेड' सिनेमात एकत्र झळकले होते. त्यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली.  यानंतर ऑनस्क्रीन जोडी हळूहळू ऑफ-स्क्रीनही झाली. अनेकदा दोघंही एकत्र स्पॉट झाले आहेत.  त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दोघे सोबत जरी झळकत असले तरी अद्याप त्यांनी नात्याबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचे स्टार आहेत. 

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडासेलिब्रिटी