Join us

'झिरो' चित्रपटातील बव्वा सिंग आता ट्‌विटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 19:07 IST

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा शाहरूख खानचा झिरो हा चित्रपट येणार आहे.

ठळक मुद्देझिरो चित्रपट २१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडमधील बहुतेक सेलेब्स सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांना त्यांच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला वापर करता येतो. सेलेब्सने बऱ्याचदा स्वतःच्या नावानेच सोशल मीडियावर आपले अकाउंट ओपन केले आहे. मात्र आता एका बॉलिवूडच्या कलाकाराने आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेच्या नावाने अकाउंट ओपन केले आहे. हा अभिनेता कोण असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा शाहरूख खानचा झिरो हा चित्रपट येणार आहे. शाहरूख या चित्रपटाबाबत फारच उत्साहीत दिसून येत आहे. तो या चित्रपटात एका बुटक्‍या व्यक्तीचे पात्र साकारत आहे. बव्वा सिंग असे त्याचे नाव आहे. शाहरूखने त्यामुळे याच पात्राच्या नावाने ट्‌विटरवर अकाऊंट सुरू केले आहे. ट्‌विटरवरून शाहरूखने बव्वा सिंग म्हणून प्रेमळ धमकी देखील दिली आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी देखील त्याच्या पहिल्या ट्‌विटचे स्वागत केले आहे. या ट्‌विटर अकाऊंटवरून शाहरूखने चाहत्यांना बव्वा सिंगची ओळख करून दिली आहे. त्यासोबतच त्याने ट्‌विटरवाले तयारीत राहा, बव्वा सिंग आला आहे असे लिहिले आहे. 

दिग्दर्शक आनंद एल. राय आणि शाहरूख झिरो चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. या चित्रपटात शाहरूख सोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या देखील झळकणार आहेत. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

टॅग्स :झिरो सिनेमाशाहरुख खान