Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी वयाच्या १५ व्या वर्षी झाली ट्रान्सजेंडर, वेगळं नावही सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 19:30 IST

जगात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रीच्या लेकीने ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय सर्वांना

एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी वयाच्या १५ व्या वर्षी ट्रान्सजेंडर झालीय. त्यामुळे संपूर्ण जगभरात अभिनेत्यांच्या चाहत्यांच्या मनात एकच खळबळ उडाली आहे. हा अभिनेता म्हणजे 'बॅटमॅन' फेम बेन अफ्लेक. बेन अफ्लेकच्या लेकीन तिच्या आजोबांच्या शोकसभेत ही मोठी घोषण केलीय. बेनची लेक जिचं नाव आधी सेराफिन रोझ असं होतं तिने स्वतःचं नावही बदललंय. वाचा सविस्तर.

बेन अफ्लेक आणि जेनिफर गार्नर यांची १५ वर्षीय मुलगी सेराफिनने हा धाडसी निर्णय जगजाहीर गेलाय. सेराफिनने तिचं नवं नाव फिन असं ठेवलंय. आईच्या वडिलांच्या शोकसभेला जेनिफरने सर्वांना तिची ही नवी ओळख करुन दिली. ब्लॅक सूट, कापलेले केस अशा वेगळ्या लूकमध्ये सेराफिन आली होती. तिने भाषण करताना तिचं नाव आणि नवी ओळख सर्वांना सांगितलीय.

बेन अफ्लेकने 'बॅटमॅन'च्या भूमिकेतून प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. बेन आणि जेनिफर यांनी २००२ साली प्रेम व्यक्त करुन त्यांच्या नात्याची कबूली दिली. त्यांची मुलगी सेराफिन आता ट्रान्सजेंडर झालीय. अजून बेन आणि जेनिफर या दोघांनी या गोष्टीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीय. दरम्यान ट्रान्सजेंडर झाल्याची ओळख लपवून न ठेवल्याने फिनचं कौतुक होतंय. 

टॅग्स :हॉलिवूड