Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 13:30 IST

बाहुबली फेम राणा दग्गुबातीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा नुकताच पार पडला. त्यानंतर ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

बाहुबली चित्रपटात भल्लालदेवच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राणा दग्गुबाती सध्या लग्नामुळे सातत्याने चर्चेत येत असतो. गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लॉकडाउनमध्ये राणा दग्गुबातीने कुटुंबातील सदस्य व खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. आता तो लग्नाच्या तयारीला लागला आहे. साखरपुड्यानंतर राणा दग्गुबाती आणि मिहिका लग्न कधी करणार हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. या दरम्यान आता राणा दग्गुबातीने इंडिया टुडेशी बोलताना लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे.

लग्नाच्या तारखेबद्दल राणा दग्गुबातीने सांगितले की, साखरपुड्यानंतर मी आणि मिहिका 8 ऑगस्टला लग्न करणार आहे. हा सोहळा खूप खासगी असेल आणि माझ्या जीवनातील सर्वात चांगला काळ असेल.

मिहिका बजाजचे कौतूक करत राणा दग्गुबाती म्हणाला की, माझे मिहिकावर खूप प्रेम आहे आणि आमच्या दोघांची जोडी खूप छान वाटते. मिहिका माझ्या घरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आपल्या कुटुंबासोबत राहते. लॉकडाउनमध्ये जेव्हा आम्ही दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला जास्त त्रास झाला नाही. त्यामुळे आता आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. मिहिका खूप सुंदर आहे. ती माझ्या फिलिंग्स समजते आणि याहून जास्त काय पाहिजे.

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.

टॅग्स :राणा दग्गुबती