Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:07 IST

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतून पहिल्यांदाच संत बाळूमामा यांचे जीवनकार्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देसंत बाळूमामा यांचे जीवनकार्य 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेत

कलर्स मराठीवर नुकतीच सुरु झालेली 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्याच आठवड्यापासून मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांचे जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेमध्ये संत बाळूमामा यांची भूमिका साकारणारा समर्थ, सुंदरा (बाळूमामांची आई) अंकिता, मयप्पा (बाळूमामाचे वडील) तसेच पंच – पंच बाई, देवऋषी या कलाकारांचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावतो आहे. 

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेमध्ये प्रत्येक गोष्ट त्या काळाचा विचार करून करण्यात आली आहे. मग ते गाव असो वा कलाकारांची वेशभूषा असो वा दाग दागिने किंवा पोशाख सगळ्यावरच बारकाईने काम केलेले आहे आणि त्यामुळेच लोकांना ते पसंत देखील पडत आहे. कलाकार, कथा, अभिनय, शीर्षक गीत सगळ्यालाच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. शीर्षक गीतामध्ये जवळपास ७० कलाकारांचा समावेश होता. तसेच संत बाळूमामा यांची भूमिका साकारणाऱ्या समर्थसाठी खास हैद्राबादहून फेटा मागविण्यात आला होता. या मालिकेच्या निमित्ताने संत बाळूमामांचे अनेक पैलू त्यांच्या भक्तांना पुन्हा एकदा बघण्याची संधी मिळणार आहे. मालिकेमध्ये पुढच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक घडामोडी, घटना बघायला मिळणार आहे.संत बाळूमामा आणि त्यांची आई सुंदरा या दोघांमधील खूप सुंदर आणि अतूट नाते मालिकेमध्ये अत्यंत छानप्रकारे दाखविण्यात येत आहे. त्यांच्या आईंचा त्यांच्यावर असलेला विश्वास, प्रेम तसेच त्यांची आईवर असलेली निष्ठा अतिशय अप्रतिमरीत्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. बाळूमामांचे हजारो अनुयायी त्यांच्यापुढे आजही नतमस्तक होतात. बाळूमामांच्या मेंढ्याचे कळप अतिशय शुभ मानले जातात. त्यांच्या देवस्थानी त्यांचे अनेक भक्त त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याकरता जातात. हजारो लोकांना आधार देणाऱ्या असाधारण माणसाचे म्हणजे संत बाळूमामांचे चरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळत आहे.

  

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलं