Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाळुमामाच्या नावाने चांगभलं'मधील तात्या अडकला लग्नबेडीत, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 12:06 IST

तात्यांची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता अक्षय टाक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील बाळुमामाच्या नावाने चांगभलं मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ही मालिका पौराणिक कथेवर आधारीत असून संत बाळूमामा यांच्या बालपणीपासूनचा प्रवास या मालिकेत पहायला मिळत आहे. या मालिकेत तात्यांची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता अक्षय टाक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.

अक्षय टाक २८ नोव्हेंबरला निकिता बुरांडेसोबत लग्नबेडीत अडकला आहे. याच वर्षी ११ ऑगस्टला अक्षय आणि निकिता या दोघांचाही साखरपुडा झाला होता. अक्षयने आपल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील सोशल मीडियावर शेअर केली होती.

आता त्यांचे लग्न २८ नोव्हेंबरला आष्टी येथे पार पडला. त्या दोघांनी प्री व्हेडिंग फोटो व व्हिडिओदेखील शूट केला होता. 

अक्षय हा मूळचा पैठणचा असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. अक्षयने आस्वाद प्राथमिक शाळा आणि श्रीनाथ हायस्कुल पैठण येथून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने आपल्या अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ थेटर आर्टस्’, मुंबई युनिव्हर्सिटी येथे ऍडमिशन घेतले.

‘अकॅडमी ऑफ थेटर आर्टस्’ मध्ये असताना त्याने अनेक नाटकांत कामे केली. सुरुवातीला त्याने काही दिवस मराठी नाटकांमध्ये कामे करायला सुरुवात केली. त्यातलेच ‘पार्टी’ हे एक नाटक आहे. शिकत असतानाच त्याने काही लघुपटात देखील काम केले आहे.

 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंकलर्स मराठी