Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाई गं' चित्रपटातील "वाघाचा डॉगी" गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्नील जोशीबरोबर थिरकताना दिसल्या परदेशी बाहुल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:03 IST

"जंतर मंतर बाई गं" या गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आता 'बाई गं' सिनेमातील "वाघाचा डॉगी" हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

सध्या 'बाई गं' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमातून अभिनेता स्वप्निल जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हटके लव्ह स्टोरी 'बाई गं' सिनेमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. "जंतर मंतर बाई गं" या गाण्यावरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आता 'बाई गं' सिनेमातील "वाघाचा डॉगी" हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

प्रत्येक कपलची लव्ह स्टोरी खास असते. पण, जेव्हा त्या लव्ह स्टोरीमध्ये एखादी बायको रुसते. तेव्हा नवऱ्याला दिवसात पण तारे दिसायला लागतात. असंच काहीसं स्वप्निल जोशीबरोबरही झालं आहे. "वाघाचा डॉगी" या गाण्यातून स्वप्निलने ही व्यथा मांडण्यात आली आहे. या गाण्यात परदेशी मुलीही थिरकताना दिसत आहेत. या गाण्याच्या हुक स्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "वाघाचा डॉगी" हे गाणं जय अत्रे यांनी लिहिलं आहे. तर नकाश अझीझ आणि वृषा दत्ता यांनी गाण्याला आवाज दिला आहे. वरूण लिखाते ह्यांनी या गाण्याला संगीत देण्याबरोबरच इंग्लिश लिरिक्स सुद्धा लिहिले आहेत. 

'बाई गं' या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी लिहिले आहेत. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीसिनेमामराठी अभिनेतामराठी चित्रपट