Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाहुबली'मधील या अभिनेत्रीकडे आहे दीड कोटींची कार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 19:19 IST

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटांतील ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची.

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटांतील  ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. होय, अभिनेता प्रभासने या चित्रपटात बाहुबली साकारला तर अभिनेत्री रम्या कृष्णन हिने राजमाता शिवगामी देवीचे पात्र जिवंत केले. शिवगामी देवीच्या रूपात रम्याशिवाय इतर कुणाची कल्पनाही आता आपण करू शकणार नाहीत, इतका जीव तिने या भूमिकेत ओतला.  या भूमिकेने रम्याला बरीच लोकप्रियता दिली. ‘बाहुबली’ चित्रपटात अमरेन्द्र बाहुबली जितका भाव खावून गेलास. तितकाच भााव खावून गेली ती बाहुबलीची आई शिवगामी.  हुबली २ सिनेमासाठी राम्याने जवळजवळ अडीच कोटी रुपये मानधन घेतलं असल्याचं समजतं आहे.

राम्याने तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा सर्व भाषा मिळून जवळजवळ २०० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे.

पण बाहुबली सिनेमातील शिवगामी देवी ही भूमिका तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे. ही भूमिका सुरुवातीला श्रीदेवीला ऑफर करण्यात आली होती. 

राम्या कृष्णननच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तिच्याकडे मर्सिडीज बेंज एस ३५० ही कार आहे. ज्याची किंमत तब्बल १ कोटी २० लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, २०१२ साली राम्या हिच्या बंगल्यातून तिच्या कामवालीने तब्बल १० लाख रुपयांच्या सोन्याची चोरी केली होती. 

राम्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा एखादा लेखक किंवा दिग्दर्शक मला सिनेमाची कथा ऐकवतो तेव्हा खरंतर मला खूप झोप येते. पण जेव्हा मला दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी बाहुबली सिनेमाची कथा सांगितली तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: काटे उभे राहिले. एवढंच नव्हे तर मी पूर्ण सिनेमाची कथा ही जवळजवळ दोन तास मन लावून ऐकत होते. 

राम्याने शाहरुख खान, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि अनिल कपूरसोबत सुद्धा काम केलं आहे.

राम्याने १२ जून २००३ मध्ये तेलुगू सिनेनिर्माता कृष्णा वामसी याच्याशी लग्न केलं होतं. 

टॅग्स :रम्या कृष्णनबाहुबली