Join us

'हाथी मेरे साथी'मध्ये दिसणार राणा दुग्गाबत्ती, पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:07 IST

Haathi Mere Saathi Movie Poster : 2 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इरोस इंटरनॅशनलच्या अंतर्गत यावर्षी तीन सिनेमांची निर्मिती करण्यात येणार आहे. हाथी मेरे साथी, कदान आणि अरण्या या सिनेमांचा समावेश आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगु भाषेतील हे तीन सिनेमा आहेत. या तिनही सिनेमांमध्ये राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. तेलुगू सिनेमा कदान आणि तमिळ सिनेमा अरण्यामध्ये विष्णु विशालसुद्धा दिसणार आहे. तर हिंदीतील हाथी मेरे साथीमध्ये पुलकित सम्राट महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ऐवढेच नाही तर श्रिया पिळगांवकर आणि जोया हुसैनदेखील सिनेमात असणार आहेत.  

आसामच्या काझीरंगा येथे हत्तींचा अधिवास ताब्यात घेण्याच्या दुर्दैवी घटनेने या तिन्ही चित्रपटांची गोष्ट आधारित आहे. या चित्रपटात राणा दुग्गाबत्ती अशा माणसाची भूमिका साकारत आहे ज्याने प्राण्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आपले बहुतेक आयुष्य व्यतीत केले आहे.

या तीनही सिनेमाबाबत बोलताना  इरोस इंटरनॅशनल मीडियाचे व्हाईस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील लुल्ला म्हणाले, तिनही सिनेमांची कथा खूप खास आहे. आम्हाला खात्री आहे की त्याची अनोखी कहाणी प्रेक्षकांना प्रभावित करू शकेल. 

दिग्दर्शक प्रभु सोलोमन म्हणाले की, “मी या प्रोजेक्टबाबत खूप उत्साही आहे. त्याचा उद्देश असा आहे की तो भारताच्या वेगवेगळ्या भागात प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल, म्हणूनच ही कथा तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये आम्ही घेऊन येत आहोत.  

टॅग्स :हाथी मेरे साथीराणा दग्गुबतीश्रिया पिळगावकर