Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शेट्टीच्या नाही तर मग कोणाच्या प्रेमात आहे प्रभास?, नाकारल्या 5000 लग्नाच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 12:02 IST

प्रभास अमेरिकेतील एक दिग्गज उद्योगपतीच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार अशी माहिती होती पण..

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कन्कल्युजन या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. आज प्रभास आपला 40 वा वाढदिवस साजरा करतोय. आज आम्ही तुम्हाला प्रभासच्या लव्हलाईफबाबत माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. 

बाहुबली सिनेमाच्या रिलीजनंतर अवघ्या काही दिवसातच प्रभास त्याच्या पेक्षा वयाने 13 वर्षाने लहान असलेल्या मुलीसोबत लग्न करणार आहे. मात्र या सगळ्यावर प्रभास काहीच बोलला नाही. बाहुबलीच्या यशानंतर मुली प्रभासच्या प्रेमात वेड्या झाल्या. जवळपास 5 हजार मुलींच्या लग्नाचे प्रपोजल आले. पण प्रभासने सर्वांना नकार दिला. त्यानंतर प्रभास अमेरिकेतील एक दिग्गज उद्योगपतीच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार अशा अफवा उडाल्या होत्या. पण त्यावेळी देखील प्रभासने मौन पाळणचं पसंत केले. 

यासगळ्यात प्रभासचे नाव नेहमीच जोडले गेले ते अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत. ‘बाहुबली-२’ प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली. प्रभास आणि अनुष्का दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्या कायम नाकारल्या.  जवळपास दोघांची 10 वर्षांपासून मैत्री आहे.   २००९ मध्ये आलेल्या ‘बिल्ला’ या चित्रपटात अनुष्का शेट्टी आणि प्रभासने एकत्र काम केले होते. प्रभासने अनुष्काला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. अनुष्कासाठी प्रभासने साहोचे स्पेशल स्क्रिनिंग देखील ठेवले होते. आता दोघे लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागली आहे. 

आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19-20 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख, सलमान आणि दीपिकाचा तो फॅन आहे. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.

टॅग्स :प्रभासअनुष्का शेट्टी