Join us

'बाहुबली 2'ला पूर्ण झाले 3 वर्षे, प्रभासने मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 15:50 IST

प्रभासने 'बाहुबली २'वर केलेल्या प्रेमासाठी चाहत्यांचे आभार मानले.

प्रभासनेबाहुबली २ ला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चाहत्यांनी बाहुबली-२ वर केलेल्या प्रेमासाठी चाहत्यांचे आभार मानले. यावेळी आपल्या सोशल मीडियावर प्रभासने लिहिले की, चाहत्यांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे आणि ही केवळ देशाने गौरवलेला सिनेमा नाही तर माझ्यादेखील आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट आहे.प्रभासच्या बाहुबलीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. प्रभास असा पहिला अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटाला 'बाहुबली'ला रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपला प्रीमियर साजरा करण्याचा बहुमान मिळाला. या ठिकाणी प्रीमिअर होणारा हा सर्वात पहिला नॉन इंग्लिश सिनेमा ठरला. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 650 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या भागाने जगभरात 1027.84 कोटी अशी अविश्वसनीय कमाई केली आहे.

बाहुबली-२ भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असून प्रदर्शनाच्या 3 वर्षानंतर देखील आजपण भारताच्या टॉप ग्रोसिंग यादीत आपली जागा कायम ठेऊन आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई केली होती आणि आईएमडीबीवर 9.3 च्या रेटिंगपर्यंत पोहोचणारा भारतातील पहिलै सिनेमा होता.

 

टॅग्स :प्रभासबाहुबली