Join us

'बागी ४' सिनेमाच्या कमाईचा आकडा घसरला, ३ दिवसात कमावले फक्त 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:39 IST

'बागी ४' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. या सिनेमाने तीन दिवसात फक्त इतक्या कोटींची कमाई केली आहे

काहीच दिवसांपूर्वी टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेला 'बागी ४' हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही 'बागी ४' चांगली कमाई करेल, अशी शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात उलटं चित्र झालेलं दिसतंय.  'बागी ४'  या बहुप्रतिक्षित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे. मागील 'बागी' चित्रपटांच्या तुलनेत कमाईच्या बाबतीत  'बागी ४' हा चित्रपट अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करु शकला नाही. जाणून घ्या.

 'बागी ४' चित्रपटाची कामगिरी

sacnilk च्या अहवालानुसार 'बागी ४' ने पहिल्या दिवशी १२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १० कोटींची कमाई केल्यानंतर, चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३१.२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. १२० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई बघता ती खूपच कमी आहे. चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन ३८.५० कोटी रुपये झाले असले तरी कमाईचा इतका कमी आकडा पाहणं हा निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे.

या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, विशेषतः त्याच्या ॲक्शन सीन्समुळे. परंतु चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरू शकला नाही. समीक्षकांनीही या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवर अशी निराशाजनक कामगिरी पाहता, 'बागी ४' हा टायगर श्रॉफच्या कारकिर्दीतील सर्वात फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. संजय दत्त, टायगर श्रॉफ, सोनम बाजवा, हरनाज संधू इतकी तगडी स्टारकास्ट असूनही 'बागी ४' या चित्रपटावर फ्लॉपची टांगती तलवार आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफबागी ३संजय दत्तहरनाज संधू