Join us
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षांपासून मुंबईत राहतोय बॉलिवूडचा हा अभिनेता, पहिल्यांदाच घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 13:47 IST

शिल्पा शेट्टी, सलमान खान, आयुष शर्मा, विवेक ऑबेरॉय व जितेंद्र यांच्यासोबत बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी गणेशोत्सव साजरा केला. मात्र यावर्षी पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणासाठी गणेशोत्सव स्पेशल होता.

देशभरातील लोकांसोबत बॉलिवूडमधील कलाकार मोठ्या उत्सवात गणेशोत्सव साजरा करतात. शिल्पा शेट्टी, सलमान खान, आयुष शर्मा, विवेक ऑबेरॉय व जितेंद्र यांच्यासोबत बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी गणेशोत्सव साजरा केला. मात्र यावर्षी पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणासाठीगणेशोत्सव स्पेशल आहे. आयुषमानने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत लालबागचा राजासमोर नतमस्तक झालेला पहायला मिळतो आहे. 

आयुषमान खुराणा त्याचा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल प्रदर्शित होण्यापूर्वी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. ११ वर्षांपासून मुंबईत राहणारा आयुषमान पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. आयुषमाननं फोटो शेअर करत लिहिलं की, मी मागील ११ वर्षांपासून मुंबईत राहतो आहे. ही पहिली वेळ आहे जेव्हा लालबागच्या राजाच्या दरबारी पोहोचलो आहे. आनंदित आहे. गणपती बाप्पा मोरया.

आयुषमान खुराणाचा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात आयुषमान एका मुलाची भूमिका साकारणार आहे जो रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारत असतो. त्यानंतर वडीलांच्या टीकेमुळे तो कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो. कॉल सेंटरमध्ये तो मुलीच्या आवाजात कस्टमर्ससोबत बोलत असतो. मथुरा शहरातील सर्व तरूण त्याच्या आवाजाचे दीवाने होतात.

आयुषमानचे चाहते त्याच्या ड्रीम गर्ल चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

टॅग्स :आयुषमान खुराणागणेशोत्सवलालबागचा राजाड्रिम गर्ल