Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताहिरा कश्यपने शेअर केला आयुषमान खुराणा आणि तिचा जुना फोटो, फोटोत आयुषमानला ओळखणे होतंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 17:55 IST

ताहिरा कश्यपने आयुषमान आणि तिचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अगदी तरुण वयातील आयुषमान आणि ताहिरा आपल्याला पाहायला मिळत आहेत.

ठळक मुद्देया फोटोसोबत ताहिराने लिहिले आहे की, आम्ही एकमेकांना डेट करून केवळ वर्षच झाले होते. त्यावेळी आमचा दोघांचाही सोशल डिस्टन्सिंगवर प्रचंड विश्वास होता.

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. आयुषमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप देखील सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत तिच्या फॅन्सशी संवाद साधत आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

ताहिरा कश्यपने आयुषमान आणि तिचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अगदी तरुण वयातील आयुषमान आणि ताहिरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फोटोसोबत ताहिराने लिहिले आहे की, आम्ही एकमेकांना डेट करून केवळ वर्षच झाले होते. त्यावेळी आमचा दोघांचाही सोशल डिस्टन्सिंगवर प्रचंड विश्वास होता. ताहिराची ही पोस्ट सगळ्यांनाच आवडत आहे. या पोस्टवर आयुषमान आणि ताहिराचे फॅन्स तर कमेंट करत आहेत. पण त्याचसोबत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील यावर कमेंट केली आहे. यामी गौतमने हा फोटो खूपच छान असल्याचे कमेंटद्वारे म्हटले आहे तर एकता कपूरने वॉव अशी कमेंट दिली आहे. 

आयुषमानने ताहिराला प्रपोज कसे केले हे त्याने काहीच दिवसांपूर्वी त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, ते 2001 चे वर्षं होते... आम्ही आमच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होतो. मी रात्री ताहिरासोबत फोनवर बोलत होतो. रात्री 1 वाजून 48 मिनिटांनी फोनवर बोलत असताना माझ्या मनातील भावना मी ताहिराला सांगितल्या होत्या. त्यावेळी ब्रायन एडम्सचे गाणे माझ्या डोक्यात घुमत होते. त्या गोष्टीला 19 वर्षं झाली. 

आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स असून १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २००८ साली लग्न केले. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. वीराजवीरचा जन्म 2012 मधील तर वरुष्काचा जन्म 2014 मधील आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणाताहिरा कश्यप