Join us

आयुषमान खुरानाच्या 'आर्टिकल १५'चे शूटिंग झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:00 IST

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना लवकरच 'आर्टिकल १५' चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना लवकरच 'आर्टिकल १५' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा आयुषमान दबंग पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे.

आयुषमान खुरानाने 'आर्टिकल १५' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती द्विटरवर दिली, त्याने लिहिले की,'एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले जो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रासंगिक व महत्त्वपूर्ण सिनेमा असणार आहे. मला असा अनमोल रत्न देण्यासाठी अनुभव सिन्हा सर तुमचा आभारी आहे.'

'आर्टीकल १५' सिनेमात आयुषमान खुरानासोबत ईशा तलवार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा, एम. नास्सर, आशीष वर्मा व जीशान अयूब हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सांगितले की, 'माझा नवा चित्रपट इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा आहे.'

या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये आयुषमान खुरानाने काळ्या रंगाचा चश्मा, हातात कागद आणि चेहऱ्यावर प्रामाणिक अधिकाऱ्याचे भाव पाहायला मिळाले. त्याच्या खांद्यावर उत्तर प्रदेश पोलिसचा लोगोदेखील लावलेला आहे. ज्यावरून या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशची असेल हे समजते.

आयुषमान खुरानाने २०१२ साली शुजीत सरकारच्या 'विकी डोनर' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

गेल्या वर्षी त्याचा 'अंधाधून' व 'बधाई हो' चित्रपट प्रदर्शित झाला व या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी त्याचे तीन चित्रपट येणार असून 'आर्टिकल १५' व्यतिरिक्त 'ड्रीम गर्ल' व 'बाला' या चित्रपटात तो झळकणार आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणाबधाई हो