Join us

आयुषमान खुराणा दिसणार वेगळ्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:45 IST

अभिनेता आयुषमान खुराणाने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.

ठळक मुद्देआयुषमान खुराणा दिसणार वेगळ्या अंदाजातड्रिम गर्ल चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आयुषमान

अभिनेता आयुषमान खुराणाने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. नुकताच त्याचा बधाई हो हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटानंतर आता तो एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. तो ड्रिम गर्ल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'ड्रिम गर्ल'चे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यात आयुषमान मजेशीर लूकमध्ये दिसत आहे. साडी नेसलेल्या आयुषमान डोक्यावर पदर घेत हातात बांगड्या आणि पायात चप्पल घालून गाडीवर बसलेला दिसतोय. त्याच्यामागे जीवन मरण दुकानाचे आणि रामलीला समितीचे मंदिरही आहे.

एकता कपूरच्या 'बालाजी टेलीफिल्म्स'च्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. शोभा कपूर, एकता कपूर आणि आशिष सिंगद्वारे निर्मित 'ड्रिम गर्ल' चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहे. चित्रपटात आयुषमान शिवाय नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'विकी डोनर' ते 'शुभ मंगल सावधान'पर्यंत आयुषमान खुराणाच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. 'विकी डोनर'नंतर आयुषमानच्या करिअरची गाडी रूळावर धावू लागली. यानंतर 'नौटंकीसाला', 'बेवकूफियां', 'हवाईजादा' हे चित्रपट त्याने केलेत. पण हे चित्रपट दणकून आपटले आणि आयुषमानच्या करिअरला करकचून ब्रेक लागला. पुढे करिअरची गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी त्याला २०१५ ची प्रतीक्षा करावी लागली. यावर्षी 'दम लगा के हईशा' आला. चित्रपट हिट झाला आणि आयुषमानच्या करिअरची गाडी सूसाट पळत सुटली.

टॅग्स :आयुषमान खुराणाबधाई हो