Join us

आयुष शर्माने सांगितला लग्नातला 'तो' किस्सा; ज्यामुळे त्याला आमिर खानच्या समोर येणं झालं होतं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 07:00 IST

सलमान खान आणि आयुष शर्माचा नुकताच अंतिम: द फायनल ट्रुथ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि आयुष शर्माचा नुकताच अंतिम: द फायनल ट्रुथ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता आयुष शर्माने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी कपिलने आयुषसोबत धमाल केली आहे. यावेळी आयुषने त्याच्या लग्नातील एक किस्सा यावेळी सांगितला.

आयुष शर्मा आणि सलमान खानची बहिण अर्पितासोबत २०१४ साली लग्न केले होते. त्यावेळीचा एक किस्सा आयुषने कपिल शर्मा शोमध्ये शेअर केला. ज्यामुळे त्याला खूप लाज वाटत होती. लग्नाच्या वरातीमध्ये आयुष घोडीवर बसून निघाला होता. त्यावेळी अर्पिता त्याला सतत मेसेज करत होती. ती तयार नसल्यामुळे थोडे आरामात येणास सांगत होती.

स्वत:च्या लग्नातच माझा चेहरा लपवत राहिलोत्याने पुढे सांगितले की, जसे आम्ही पोहचलो तेव्हा आमिर खान माझ्याजवळ आले आणि म्हणाले मी तुला घोडीवरून खाली उतरवतो. ते मला खाली उतरवायला आले. मात्र त्यावेळी माझी सलवार अडकली आणि मी थेट आमिर यांच्या अंगावरच पडलो. ते बिचारे मला हाय म्हणायला आले होते आणि मी त्यांच्या अंगावरच पडलो. त्यानंतर मी स्वत:च्या लग्नातच माझा चेहरा लपवत राहिलो. त्यांना माझा चेहरा पाहून हा मुलगा अंगावर पडला हे आठवू नये म्हणून. आयुष आणि अर्पिताला आहिल आणि आयत ही दोन मुले आहेत.

टॅग्स :आयुष शर्मासलमान खानआमिर खान