Join us

अविनाश नारकर यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, म्हणाले- "तुम्ही बायकोला डोक्यावर बसवून ठेवलात तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:04 IST

अविनाश-ऐश्वर्या यांनी करिअर करण्यासोबतच सुखी संसारही केला. एकमेकांना त्यांनी कायमच साथ दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्याकडे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. आता अविनाश नारकर यांनी सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे. 

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अविनाश-ऐश्वर्या यांनी करिअर करण्यासोबतच सुखी संसारही केला. एकमेकांना त्यांनी कायमच साथ दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्याकडे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. आता अविनाश नारकर यांनी सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे. 

अविनाश नारकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावर ते रील बनवत असतात. आतादेखील त्यांनी सुखी संसाराचा मंत्र सांगणारा मजेशील रील बनवला आहे. यामध्ये ते म्हणतात, "मी दोन व्यक्तींच्या आदर करतो आणि तुम्हीदेखील केली पाहिजे. एक म्हणजे तुमच्या पत्नीची आणि दुसरं म्हणजे हेल्मेटची. दोघांना डोक्यावर बसवून ठेवलात तर तुमचं जीवन सुरक्षित राहील". "पत्नीमहात्म्य...!! हाच तो मंत्र सुखी संसाराचा आणि आनंदी जीवनाचा", असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, अविनाश यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. आजही ते मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अविनाश यांचे रील प्रचंड व्हायरल होत असतात. त्यांच्या रीलला प्रेक्षकांची पसंतीही मिळते. अनेकदा ते ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही रील बनवतात. 

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकर