Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’च्या ‘थेनॉस’ने शेअर केला न्यूड फोटो, चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 13:17 IST

मार्वल स्टुडिओच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम ’मध्ये थेनॉसची खतरनाक भूमिका साकारणारा जॉशने हा फोटो शेअर केला आणि त्याच्या या फोटोवर कमेंट्स पाऊस पडला

ठळक मुद्देअ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमणने न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि वाद सुरु झाला. अगदी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली. मिलिंद कालच यावर बोलला होता. न्यूड म्हणजे काय, देवाने जन्मास घातले तसे. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नं वेगळी असतात, असे मिलिंद म्हणाला. मिलिंद पाठोपाठ आता हॉलिवूड अभिनेता जॉश ब्रोलिन यानेही त्याचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मार्वल स्टुडिओच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम ’मध्ये थेनॉसची खतरनाक भूमिका साकारणारा जॉशने हा फोटो शेअर केला आणि त्याच्या या फोटोवर कमेंट्स पाऊस पडला. थेनॉस, कुठल्या ग्रहावर पोहोचलास? थेनॉस निवृत्तीची तयारी सुरू केली का? अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या. जॉशचा हा फोटो त्याची पत्नी कॅथरिन ब्रोलिन हिने कॅमेºयात कैद केला आहे. फोटो स्कॉटलंडचा आहे. स्कॉटलंडमध्ये जॉश व त्याची पत्नी हॉलिडे एन्जॉय करत आहेत. यादरम्यान नग्नावस्थेत घराबाहेर बसून जॉश कॉफीचा आनंद घेतोय.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या सुपरहिरोपटात तब्बल 33 सुपरहिरो झळकले होते. या चित्रपटाला दोन भागांमध्ये तयार करण्यात आले होते. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी कमाईचे सर्व विक्रम मोडून टाकले. यामध्ये खलनायक थेनॉसची भूमिका अभिनेता जॉश ब्रोलिनने साकारली होती. त्यांच्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. 

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेम