मार्वेल फिल्म ‘अॅव्हेंजर्स -एंडगेम’ या बहुप्रतिक्षीत सुपरहिरो चित्रपटाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली असताना, सुपरहिरो फिल्म्सच्या चाहत्यांसाठी एक फक्कड खबर आहे. होय, सगळे काही जमून आलेच तर मार्वेलच्या पुढच्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची वर्णी पक्की मानली जात आहेत.‘अॅव्हेंजर्स - एंडगेम’च्या भारतातील प्रमोशनल इव्हेंटमध्ये खुद्द या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक जो रूस यांनी याबाबतचे संकेत दिलेत. बॉलिवूडच्या कुठल्या स्टारसोबत काम करू इच्छिता? असा प्रश्न रूसो यांना विचारण्यात आला. यावर रूसो यांनी इंटरनॅशनल स्टार प्रियंकाचे नाव घेतले. प्रियंका एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिच्यासोबत काम करायची संधी मिळाल्यास आणखी उत्तम होईल, असे रूसो यांनी सांगितले. सध्या प्रियंकासोबत एका प्रोजेक्टवर चर्चा सुरु आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. अर्थात या प्रोजेक्टबद्दल सांगणे त्यांनी टाळले.
कमला खान ही एक काल्पनिक सुपरहिरो आहे. मार्वेल कॉमिक्सद्वारा प्रकाशित अमेरिकन कॉमिक्समधील याच लोकप्रिय पात्रावर चित्रपट आणण्याचा मार्वेलचा विचार आहे. कमला खान ही मार्वेल कॉमिक्समधील एकमेव मुस्लिम सुपरहिरो आहे.