Join us
Daily Top 2Weekly Top 5

थिएटरमध्ये गाजलेला 'आता थांबायचं नाय' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल?

By देवेंद्र जाधव | Updated: June 17, 2025 14:44 IST

थिएटरमध्ये सुपरहिट झालेला 'आता थांबायचं नाय' हा सिनेमाची ओटीटी रिलीज डेट जाहीर झाली आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल

२०२५ मध्ये बरेच मराठी सिनेमे रिलीज झाले. हे सर्व सिनेमे प्रेक्षकांनाही तितकेच आवडले. यापैकी एक महत्वाचा सिनेमा म्हणजे 'आता थांबायचं नाय'. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'आता थांबायचं नाय' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सहकुटुंब, सहपरिवार हा सिनेमा आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी आणि कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार

'आता थांबायचं नाय' या दिवशी होणार ओटीटीवर रिलीज

'आता थांबायचं नाय' ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. हा सिनेमा आता ओटीटीवर प्रेक्षकांना घरबसल्या बघायला मिळणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २८ जूनला सायंकाळी ७ वाजता हा सिनेमा बघायला मिळणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मने याविषयीची अधिकृत पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय याच वेळी आणि याच दिवशी 'आता थांबायचं नाय' सिनेमा झी मराठी चॅनलवरही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व मराठी प्रेक्षकांना आनंद झाला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये गाजलेला हा सिनेमा ओटीटीवर धुमाकुळ घालायला सज्ज आहे.

'आता थांबायचं नाय' सिनेमाविषयी

'आता थांबायचं नाय' सिनेमाने रिलीजनंतर पुढील ३१ दिवसांमध्ये तब्बल साडेसहा कोटींची कमाई केली आहे. कमी बजेटमध्ये बनलेला 'आता थांबायचं नाय' सिनेमाची ही कमाई निश्चितच चांगली म्हणता येईल. शिवराज वायचळने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात भरत जाधव, प्राजक्ता हनमघर, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, आशुतोष गोवारीकर, पर्ण पेठे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत होता.

टॅग्स :आशुतोष गोवारिकरसिद्धार्थ जाधवभरत जाधवपर्ण पेठेमराठी अभिनेतामराठी चित्रपट