Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:13 IST

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सध्या अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते आहे. तिला या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळताना दिसते आहे. या मालिकेपूर्वी ती स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहायला मिळाली होती. सुरुवातीला तिला या मालिकेसाठी रिजेक्ट केले होते. मात्र त्यानंतर तिची  राणूअक्काच्या भूमिकेसाठी निवड झाली.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. मात्र मालिकेचे ऑडिशनमध्ये तिला नकार दिला गेला होता असे खुद्द मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे यांनी सोशल मीडियावर सांगितले. विवेक देशपांडे यांनी अश्विनीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, मी स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका करत असताना एक मुलगी, एका मह्त्त्वाच्या रोल साठी ऑडिशन द्यायला येते, या पुर्वी काय केलंय? असं विचारलं तर एका गाजलेल्या मालिकेत मेन लिडची सहकारी! हे उत्तर आल्यावर मला तीची ओळख पटते. आलेल्या अनेक मुलीं मधुन शॉर्टलिस्ट होतं होतं शेवटच्या दोन मधे ती येते पण, क्रिएटिव्ह हेडच्या मते, हिची कॉन्फिडंस लेवल दुसरी पेक्षा जरा कमीच दिसल्यामुळे, हिच्या नावाला फुल्ली बसते. (माझं मत वेगळं असतं) पण - but - लेकिन - किंतु - परंतु मुलगी माझ्या लक्षात राहते. 

पुढे त्यांनी सांगितले की, पुढे आमच्या मालिकेत पुन्हा एक नविन पात्र येतं. पुन्हा ऑडिशन्स घ्यायचं ठरतं. मी म्हणतो "त्या reject झालेल्या मुलीलाच बोलवा. ऑडिशनसाठी नको सरळ लूक टेस्ट." - ती येते, लूक टेस्ट होते आणि रिजेक्ट झालेली ती हिचका?! असा प्रश्न उभा करुन जाते आणि राणुअक्का ही आधीच्या भुमिके पेक्षा जास्त मह्त्त्वाची भुमिका तिला मिळते. त्या भुमिकेचं, खणखणीत नाणं वाजवत ती रसिकांच्या मनात तर जागा मिळवतेच पण माझ्या मनातही घर करुन राहु लागते, माझी मानसकन्या म्हणुन! राणुअक्का नंतर मेरे साई मधे एक मह्त्त्वाची भुमिका,आई कुठे काय करते मधे अनघा महाराष्ट्र शाहिर मधे माई अशा विविधरंगी भुमिका गाजवत, वाटचाल करत असताना अहिल्याबाई होळकर हि तोलामोलाची भुमिका साकारण्याची संधी तीला मिळते हे सोन्याहुन पिवळं! ती ही अश्विनी महांगडे!! समाजभान जागृत असलेली संवेदनशील कलावंत. वाढदिवसानिमित्त अश्विनीला अनेकोत्तम आशीर्वाद ! 

टॅग्स :अश्विनी महांगडेस्वराज्य रक्षक संभाजीआई कुठे काय करते मालिका