Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी अय्यर तिवारी यांची कादंबरी 'मॅपिंग लव' आली भेटीला, सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 20:25 IST

अश्विनी अय्यर तिवारी यांची कादंबरी 'मॅपिंग लव' नुकतीच प्रकाशित झाली.

अश्विनी अय्यर तिवारी यांची कादंबरी  'मॅपिंग लव' नुकतीच प्रकाशित झाली असून अनावरणाच्या आधीपासूनच ती खूप चर्चेत होती. नुकताच तिचा समावेश सुधा मूर्ति यांच्या पुस्तकांसोबत 'बेस्ट सेलिंग' यादीत करण्यात आला आहे. यामुळे आनंदीत झालेल्या अश्विनीने आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

अश्विनी अय्यर तिवारी यांनी सोशल मीडियावरील आपल्या पुस्तकाचा फोटो पोस्ट केला आहे, जो दोन प्रमुख वार्तापत्रांच्या रेकमेंडेशन सूचीतील 'टॉप 5 बेस्टसेलर फिक्शन'च्या यादीमध्ये सामील झाली आहे. या फोटोसोबत त्यांनी आपल्या भावना शब्दबद्ध करत त्या लोकांचे आभार मानले आहेत, जे या प्रवासाचा भाग होते. 

अश्विनी यांचे पुस्तक सुधा मूर्ति यांच्या सोबत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या यादीमध्ये सामील झाले असून त्या मिस्टर आणि मिसेस नारायण मूर्ती यांच्या जीवन कहाणीवर देखील एक चित्रपट बनवत आहेत.

अश्विनी सोनी लिवच्या 'फाडू'सोबत आपले डिजिटल डेब्यू करत असून त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये झी5ची 'ब्रेकपॉइंट'चा देखील सहभाग आहे.

टॅग्स :अश्विनी अय्यर तिवारी