Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी अय्यर तिवारीचा महेश भूपती-लिएंडर पेस या जोडगोळीवर आधारित माहितीपट पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 19:33 IST

अश्विनी अय्यर तिवारीने चँपियन्स महेश भूपति आणि लिएंडर पेस यांच्यावरील आपला माहितीपट नुकताच पूर्ण केला आहे.

बहुआयामी लेखक-चित्रपट निर्माती अश्विनी अय्यर तिवारीने चँपियन्स महेश भूपति आणि लिएंडर पेस यांच्यावरील आपला माहितीपट नुकताच पूर्ण केला आहे. या माहितीपटाचे लेखन-दिग्दर्शन स्वत: अश्विनीने केले आहे.  

महेश भूपती-लिएंडर पेस या जोडगोळीवर आधारित माहितीपटावर काम करताना अश्विनी अय्यर तिवारीची या दोन चँपियन्ससोबत आयुष्यभारासाठी मैत्री झाली असून हे आमच्यातील सुंदर सहयोगाचे प्रतीक असल्याचे अश्विनीने म्हटले आहे. या माहितीपटावर जवळपास दीड वर्ष सुरु असलेले काम पूर्ण झाल्याचे जाहीर करताना तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर लिहिले,"महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्या सोबतचा दीड वर्षांचा प्रवास पूर्ण झाला असून इथून पुढे आयुष्यभराच्या मैत्रीची नवी यात्रा सुरु झाली आहे. नितेश तिवारी आणि मी पहिल्यांदा सह-दिग्दर्शन करत आहोत.

माहितीपटासाठी दोन अतिशय प्रतिभावान चँपियन्सची माहिती संकलित करणे आणि लिहिणे हे देखील नितेश, पीयूष आणि माझ्यासाठी पहिल्याच अनुभव होता. आम्ही खूप आभारी आहोत आमचे स्टूडियो पार्टनर्स झी ५, ज्यांच्यासोबत या महामारीच्या कठीण काळात देखील जगभर मोठ्या प्रमाणात याची निर्मित करण्यात आम्ही यशस्वी झालो. आमच्या कार्याचा कणा असलेले वरूण शेट्टी, कवन अहलपारा, अजय राय यांच्यासोबतच माझी दमदार प्रोडक्शन, डायरेक्शन, एकाउंट्स टीम आणि बिमल पारेख यांना खूप खूप धन्यवाद आणि या वेब सीरीजच्या पैकेजिंगसाठी कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्क आणि प्रत्येक स्पोर्ट्स पार्टनर, स्पोर्ट्स पर्सन, लाइन प्रोड्यूसर यांना धन्यवाद! ज्यांच्यामुळे #Breakpoint ला आकार मिळाला.

आशा आहे कि तुम्ही झी ५ वर लवकरच या सीरीजचा तेवढाच आनंद घेऊ शकाल जितका आम्हाला भारतीय टेनिसच्या विश्व चँपियन्सना ऐकताना आणि त्यांच्याशी बोलताना आला, जे भारतीय खेळातील येणाऱ्या काळाची आकांक्षा आणि प्रेरणा आहेत."  या माहितीपटाचे नाव 'ब्रेकपॉइंट' असून त्याचा प्रीमियर झी ५ वर होणार आहे. 

टॅग्स :अश्विनी अय्यर तिवारी